Join us  

रोज वापरात असलेल्या १० वस्तू वेळेत बदलल्या नाहीत तर..? टूथब्रश-टॉवेल नक्की किती दिवस वापरता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 6:18 PM

These 10 household things expire, toothbrush, towel will make you sick, know their expiry date डेली वापरात येणारे हे १० वस्तू होतात एक्सपायरी, पाहा, कोणते आहेत ते वस्तू..

रोजच्या जीवनात आपण अनेक वस्तूंचा वापर करतो. लहानसहान गोष्टींपासून मोठ्या वस्तूंपर्यंत अनेक गोष्टींचा आपल्या कळत - नकळत वापर होतो. काही वस्तूंवर एक्सपायरी डेट लिहिलेली नसते, पण या वस्तू काही कालावधीनंतर वापरणे बंद करायला हवे. काही वस्तू व औषधांवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्यामुळे आपण त्याचा वापर कधीपर्यंत करावा हे ठरवू शकतो.

रोजच्या वापरात येणाऱ्या गोष्टी किती दिवस वापरायच्या याची माहिती असणे गरजेचं आहे. कारण शूज, टूथब्रश, टॉवेल इत्यादी वस्तू देखील काही कालावधीनंतर आउट डेटेड होतात. पण धावपळीच्या या जीवनात आपण या वस्तू वापरात जातो. त्यामुळे वेळीच हे वस्तू काही कालावधीनंतर वापरणे बंद करा. अन्यथा आपल्या आरोग्य आणि शरीरासाठी हानिकारक ठरू शकते(These 10 household things expire, toothbrush, towel will make you sick, know their expiry date).

या गोष्टी वेळीच वापरणे बंद करा

उशी - 1-3 वर्ष

चप्पल - 6 महिने

मसाले - 3 वर्ष 

टॉवेल - 1 ते 3 वर्ष

परफ्यूम - 1 ते 3 वर्ष

मिक्सर कळकट -चिकट झाला? ३ उपाय, मिक्सर दिसेल नवाकोरा चकाचक

पॅसिफायर्स - 2 ते 5 आठवडे

रनिंग शूज - 6 महिने ते 1 वर्ष

टूथब्रश - 3 महिने

कंगवा - 6 महिने

मेकअप, बॉडी स्पंज - 2 ते 3 महिने

तकिया- सेज डॉट कॉम या वेबसाईटमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, ज्या उशीवर आपण रोज डोकं ठेवून शांतपणे झोपतो, त्याची एक्सपायरी डेटही असते. 1 ते 3 वर्षांपेक्षा जास्त काळ उशी वापरणे टाळले पाहिजे. जर तुम्ही गेली अनेक वर्षे एकच उशी वापरत असाल तर, आजच बदला. उशी आपण रोज साफ करू शकत नाही. पण त्याचा वापर रोज होतो. त्यामध्ये धुळीचे कण आणि जंतू जमा होतात.

झटपट तवा घासण्याची नवीन आयडिया, फक्त एका टोमॅटोने चमकेल काळपट तवा, पाहा सोपी ट्रिक

ज्यामुळे त्वचा व आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही सकाळी शिंकत उठत असाल तर, समजा तुमची उशी धुळीने भरलेली आहे. काही वेळेनंतर उशीचे आकार देखील बदलते, ज्यामुळे मान दुखायला लागते.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया