Join us  

कांदा आणि किचन स्वच्छ्ता ? ५ ट्रिक्स, कांद्याचे एक से एक उपयोग, पाहा इफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 1:51 PM

Kitchen Hacks : 5 Ways Onions Can Make Kitchen Life Easier : जळक्या भांड्यांपासून ते किचनमधील दुर्गंधी हटवण्यासाठी अष्टपैलू कांद्याचा उपयोग करा...

'कांदा' (Onion) हा आपल्या रोजच्या जेवणातला सगळ्यात महत्वाचा पदार्थ मानला जातो. कोणताही पदार्थ बनवायचा म्हटलं की त्यात कांदा आवश्यक असतोच. भाजी, आमटी, वाटण अस काही बनवायचं म्हटलं की कांदा लागतोच. कांद्याशिवाय कोणता पदार्थ बनवायचा म्हटल की, अशक्यच आहे. काहीवेळा आपण पदार्थ बनवताना त्यात कांदा घालतो तर काही पदार्थ असे असतात की, ते खाताना आपण त्यावरून कांदा भुरभुरवून खातो. 

उग्र वास, तीव्र चव, तिखट, झणझणीत डोळ्यांत पाणी आणणारा हा कांदा (Onion Hacks) स्वयंपाकासाठी अष्टपैलूच म्हणावा लागेल. भारतीय थाळीमध्ये कांद्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे. संपूर्ण जेवण थाळीत वाढल्यानंतर लिंबाची फोड व कांदा आवर्जून तोंडी लावायला दिला जातो. कांदा हा असा पदार्थ आहे की, जो जेवणात घातल्याने पदार्थांचा स्वाद व रंग सगळेच अतिशय चविष्ट लागते. स्वयंपाकघरातील या कांद्याचा वापर आपण केवळ जेवणातच नाही तर किचनमधील इतर कामांसाठी देखील नक्कीच करु शकतो. या कांद्याचा नेमका कसा व कोणत्या गोष्टींसाठी वापर करायचा ते पाहूयात(These Brilliant Onion Hacks will Surprise you).

स्वयंपाकाशिवाय कांद्याचा असा करा वापर... 

१. जळक्या भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी :- काहीवेळा स्वयंपाक करताना भांडी जळली तर ते स्वच्छ करण्यासाठी तासंतास स्क्रबने घासण्याची गरज नाही. त्याऐवजी कांद्याची साल घेऊन जळलेल्या भांड्यात घाला त्यानंतर त्यात पाणी ओता आणि २० ते ३० मिनिटे हे पाणी उकळा. त्यानंतर डिशवॉशने हे भांड पुन्हा धुवून स्वच्छ करा. अशा रीतीने जळके भांडे कांद्याच्या वापराने काही मिनिटातच स्वच्छ होऊन निघेल. 

हॉटेलात घालतात तशी ताठ-एकही सुरकुती नसलेली बेडशीट घरच्या बेडवर कशी घालायची ? ५ टिप्स...

२. ओव्हन स्वच्छ करण्यासाठी :- कांद्याचा वापर करून ओव्हन आणि ग्रिल्स सहज स्वच्छ करू शकतात. कांद्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीसेप्टिक गुणधर्मांमुळे ओव्हन आणि ग्रिल्स सहज स्वच्छ होऊ शकतात. यासाठी कांदा सोलून त्याचे गोल तुकडे करावेत. आता ग्रिल आणि ओव्हनवर साचलेली घाण घासून पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर कोमट पाण्याने धुवा. काही वेळात ही घाण निघून जाईल. एवढेच नाही तर कांद्याच्या वापरामुळे ओव्हन आणि ग्रिलवरील अन्न दूषित करणारे बॅक्टेरिया देखील अतिशय सहज मारले जातात.  

पावसाळ्यात फरशी कितीही पुसली तरीही डास, माश्या काही जात नाहीत ? सोपे घरगुती ५ उपाय, डास - माश्या जातील पळून...

३. फळांना काळे होण्यापासून बचाव केला जातो :- फळे जास्त काळ कापून ठेवल्यास ऑक्सिडेशनमुळे ती तपकिरी किंवा काळी पडून खराब होण्याची शक्यता असते. जेव्हा फळ हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येते तेव्हा ही प्रक्रिया होते. अशा परिस्थितीत कांद्याचा वापर खूप उपयुक्त ठरतो. त्यात असलेले सल्फर आणि आर्द्रता ही प्रक्रिया मंदावते आणि फळांना तपकिरी किंवा काळे होण्यापासून रोखते. त्यासाठी कापलेल्या फळांच्या फोडींमध्ये कांद्याचे बारीक काप करून ठेवावेत.

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...

४. स्वयंपाक घरातील दुर्गंधी दूर करणे :- गॅस बर्नरवर तांदूळ सांडणे किंवा उकळलेले दूध सांडणे ही प्रत्येक घरातील एक सामान्य गोष्ट आहे, ती ताबडतोब साफ न केल्यास स्वयंपाकघरातून दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत कांद्याचा तुकडा गॅस बर्नरजवळ ठेवल्यास या घाणेरड्या दुर्गंधीच्या समस्येवर सहज मात करता येते. कारण कांद्यामध्ये असलेले सल्फर दुर्गंधी शोषून घेते.

५. भांडयांना लागलेला गंज हटवते :- स्वयंपाकघरातील भांडी, चाकू आणि चमचे अनेकदा ओलाव्यामुळे गंजतात. आपल्या रोजच्या सामान्य साफसफाईने हा भांड्यांवर चढलेला गंज काढून टाकणे पूर्णपणे अशक्य आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत कांदा हे काम अगदी सहजपणे करतो. यासाठी एक कांदा कापून गंजलेल्या पृष्ठभागावर घासून घ्यावा. असे केल्यास लवकरच, भांड्यांवरील गंज निघून जाण्यास मदत होईल.

टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरल