Lokmat Sakhi >Social Viral > फक्त जेवण गरम करण्यासाठीच नाही तर लसूण सोलण्यापासून ते कडधान्याला मोड आणण्यासाठी मायक्रोवेव्ह ठरेल उपयोगी...

फक्त जेवण गरम करण्यासाठीच नाही तर लसूण सोलण्यापासून ते कडधान्याला मोड आणण्यासाठी मायक्रोवेव्ह ठरेल उपयोगी...

5 Smart Microwave Hacks To Make Cooking Simpler : मायक्रोवेव्हमध्ये अन्न सहज आणि लवकर शिजवले जाते यात शंका नाही, पण याच्या मदतीने इतरही अनेक कामे सहज करता येतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2023 03:12 PM2023-09-03T15:12:53+5:302023-09-03T15:48:24+5:30

5 Smart Microwave Hacks To Make Cooking Simpler : मायक्रोवेव्हमध्ये अन्न सहज आणि लवकर शिजवले जाते यात शंका नाही, पण याच्या मदतीने इतरही अनेक कामे सहज करता येतात...

These microwave hacks will make your life simpler. | फक्त जेवण गरम करण्यासाठीच नाही तर लसूण सोलण्यापासून ते कडधान्याला मोड आणण्यासाठी मायक्रोवेव्ह ठरेल उपयोगी...

फक्त जेवण गरम करण्यासाठीच नाही तर लसूण सोलण्यापासून ते कडधान्याला मोड आणण्यासाठी मायक्रोवेव्ह ठरेल उपयोगी...

स्वयंपाक घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्वाच्या उपकरणांपैकी मायक्रोवेव्ह ओव्हन हे महत्वाचे उपकरण आहे. मायक्रोवेव्ह हा नवीन उपकरणाचा प्रकार गेल्या काही वर्षांत येऊनही खूपच लोकप्रिय झाला आहे. यात तुम्ही कोणताही पदार्थ फक्त गरमसुद्धा करू शकता, जसेच शिजवूही शकता. अवघ्या एका मिनिटांत पदार्थ गरम होऊ शकतो.ओव्हन हा प्रामुख्याने बेकिंगसाठी वापरला जातो. हल्ली बाजारात घरगुती छोटे मायक्रोव्हेव्हसुद्धा मिळू लागले आहेत. छोटे, स्वस्त व अतिशय आकर्षक असे विविध कंपन्यांचे ओव्हन सहज उपलब्ध होतात. 

मायक्रोवेव्ह ओव्हनमुळे कमी श्रम घेऊन झटपट जेवण तयार करता येऊ शकते. मायक्रोवेव्ह ओव्हनमुळे जेवण बनवणे इतके सोपे झाले आहे की, जेवण अगदी तासाभरात तयार असते. असा हा बहुउपयोगी मायक्रोवेव्ह फक्त जेवण बनवण्याच्याच नाही तर घरातील इतर महत्वाच्या कामांसाठी देखील वापरला जाऊ शकतो. मायक्रोवेव्हमध्ये अन्न सहज आणि लवकर शिजवले जाते यात शंका नाही पण याच्या मदतीने इतरही अनेक कामे(5 microwave hacks that can make cooking easier) सहज करता येतात. मायक्रोव्हेव्हच्या मदतीने नेमकी कोणती कोणती काम सहजपणे करता येऊ शकतात ते पाहूयात(These microwave hacks will make your life simpler).

मायक्रोव्हेव्हच्या मदतीने घरांतील इतर कोणती काम करता येतात ? 

१. कांदा चिरताना डोळ्यांत पाणी येणार नाही :- कांदा कापताना आपल्या डोळ्यात जळजळ होऊन पाणी येऊ लागते. यामुळे प्रत्येकजण कांदा कापण्यास नकार देतात. घरातील गृहिणींना रोजच्या स्वयंपाकासाठी कांदा कापावा लागतोच. अशा परिस्थितीत, मायक्रोवेव्हच्या मदतीने आपण ही समस्या त्वरित सोडवू शकता. यासाठी कांदा घेऊन त्याची सालं काढून त्याला मधोमध कापून दोन भाग करून घ्यावेत. त्यानंतर एका डिशमध्ये कांदा ठेवून २० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये  ठेवून द्यावा. यामुळे कांद्यामध्ये असलेली उग्र वासाची रसायन कमी होतात, त्यामुळे कांदा कापताना डोळ्यांत पाणी येत नाही.

मिक्सर ग्राईंडरच्या खालचा भाग स्वच्छ करणे कठीण काम? १ सोपी ट्रिक, मिक्सर ग्राईंडर दिसेल नव्यासारखे..

२. लसूण सोलणे :- लसूण पाकळ्या सोलण्यात बरेचदा गृहिणींचा खूप वेळ वाया जातो, यामुळे लसूण सोलणे हे अनेकांना अगदी बोरिंग काम वाटते. अशावेळी लसूण एका टिश्यूमध्ये ठेवा आणि मायक्रोवेव्हमध्ये १० सेकंद गरम करून घ्या. असे केल्याने, त्याची सर्व आर्द्रता नष्ट होईल आणि त्याची साल सहजपणे काढता येईल.

नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंग निघतेय ? तुम्हीसुद्धा करत नाहीत ना या ५ चुका, भांड्यांवरचे कोटिंग होईल खराब...

३. डाळी व कडधान्य फुलवण्यासाठी :- आपण अनेकदा कामाच्या गडबडीत रात्रीच्यावेळी डाळी व कडधान्य भिजवायला विसरतो. अशावेळी मायक्रोवेव्हची मदत घेऊन आपण अगदी १० ते १५ मिनिटांत डाळी व कडधान्य भिजवून फुलवू शकतो. यासाठी पाण्याने भरलेल्या एका बाऊलमध्ये डाळी किंवा कडधान्य भिजवा. आता त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घाला. त्यानंतर हा बाऊल १० मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम करून घ्यावे. नंतर ४० मिनिटे हा बाऊल तसाच मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्यावा. ४० मिनिटांनंतर जेव्हा आपण हा बाऊल मायक्रोवेव्हमधून बाहेर काढाल तोपर्यंत डाळी व कडधान्य भिजून वापरण्यासाठी तयार असतील. 

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

४. तूप बनवण्यासाठी :- आपण मायक्रोवेव्हच्या मदतीने अगदी झटपट घरच्या घरी तूप बनवू शकता. तूप बनवण्यासाठी एका मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये साय घेऊन ती ६ ते ७ मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम करून घ्यावी. त्यानंतर मध्ये एकदा चमच्याच्या मदतीने हे मिश्रण ढवळून घ्यावे. त्यानंतर पुन्हा एकदा गरम करून घ्यावे. अशाप्रकारे अगदी झटपट कमी वेळात मायक्रोवेव्हच्या मदतीने तूप बनवता येते. 

५. फळांचे रस काढण्यासाठी :- लिंबू किंवा संत्र यांसारख्या रसदार फळांमधून रसाचा प्रत्येक थेंब काढायचा असेल तर, ही फळ रस काढण्याआधी  मायक्रोवेव्हमध्ये १० सेकंद ठेवा. असे केल्याने त्यात असलेले फायबर सैल होते, ज्यामुळे फळांमधून जास्तीत जास्त रस काढण्यास मदत होते.

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

Web Title: These microwave hacks will make your life simpler.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.