फ्रिजचा वापर प्रत्येक घरात होतो. पदार्थ स्टोअर करण्यापासून ते भाजी फ्रेश ठेवण्यापर्यंत, फ्रिज दैनंदिन काम पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते. पण फ्रिजची नियमित सफाई नाही केल्यास त्यातून दुर्गधी पसरू लागते. शिवाय फ्रिज आतून पिवळसर दिसू लागते. कधीकधी फ्रीज साफ करुनही त्याच्या आत पडलेले पिवळे डाग लवकर निघत नाही. फ्रिजची नियमित साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे.
बऱ्याचदा यामुळे फ्रिजमध्ये झुरळं आणि इतर किडेही फिरतात. जे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते (Cleaning Tips). फ्रिजमधील पिवळसर डाग काढण्यासाठी आणि मेहनत न घेता स्वच्छ करायचं असेल तर, ३ टिप्सची मदत घ्या. या सोप्या टिप्सच्या मदतीने फ्रिज काही मिनिटात स्वच्छ होईल(These Tips Will Make Cleaning The Fridge Easy).
फ्रिज स्वच्छ करण्यासाठी टिप्स
- फ्रिजचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी प्रथम फ्रिजचा मेन स्वीच बंद करा. नंतर फ्रिजची आतील बाजू कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून काढा.
डाळ शिजली नाही तरी चालेल, करा १ चमचा बेसनाचे सांबार, चमचमीत झटपट रेसिपी खास थंडीसाठी
- यानंतर भांड्यात कोमट पाणी घ्या, त्यात डिटर्जंट लिक्विडचे ४ ते ५ थेंब घालून मिक्स करा. त्यात सुती कापड बुडवून फ्रिज पुसून काढा. जिथे पिवळे डाग आहेत, ते या लिक्विडच्या मदतीने स्वच्छ होईल.
- जर सुती कापडाने पुसूनही डाग निघत नसतील तर, ब्रशचा वापर करा. यासाठी घरगुती क्लीनर तयार करा. एका बाऊलमध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करा. जिथे पिवळे डाग आहेत, तिथे पेस्ट लावून ठेवा. ५ ते १० मिनिटानंतर ब्रशने डाग घासून काढा.
कोण म्हणतं मटार वर्षभर टिकत नाहीत? १ सोपी युक्ती, मटार फ्रिजमध्ये राहतील हिरवेगार-ताजे
- फ्रिजवर पडलेले पिवळसर डाग काढण्यासाठी आपण टूथपेस्ट आणि ब्रशची मदत घेऊ शकता. जिथे पिवळसर डाग असतील, त्या ठिकाणी टूथपेस्ट लावून ठेवा. काही वेळानंतर ब्रशने पिवळे डाग घासून काढा.