वर्षानुवर्षे चालत आलेली एकच स्थिर संकल्पना म्हणजे बदल. पिढ्यानुपिढ्या विचार, रहाणीमान, सवयी, आवडी निवडी आदी गोष्टी बदलत आल्या आहेत. ('They' brainwash children on social media )आपण आपले विचार आपल्या आधीच्या पिढीपेक्षा पुढारलेले मानतो. आपल्या पुढच्या पिढ्या आपल्यापेक्षा त्यांचे विचार उच्च मानतील. हे चक्र असंच चालत आलं आहे. आणि असंच चालत राहील. आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या विचार सारणीवर परिणाम होत असतो. पण जर हे बदलते विचार मानसिक हानी पोहचवत असतील तर ?('They' brainwash children on social media ) तर मग त्यांना आळा घालणे गरजेचेच आहे. नवीन पिढी प्रायव्हेट लाईफ च्या नावाखाली फार वाहवत चालली आहे. याची दखल पालकांनी घेतलीच पाहिजे. त्यांच्यावर बंधने घालण्यापेक्षा त्यांना चांगल्या वाईटाची शिकवण दिली पाहिजे. आपण बरेचदा ऐकतो की, नवीन पिढी फार कंन्फ्यूज आहे.('They' brainwash children on social media ) वेंधळून गेलेली आहे. काही मुलांसाठी घरचे नकारात्मक वातावरण, पालकांचं दुर्लक्ष आदी कारणीभुत आहेत. पण मग सर्व सोयी, चांगले संस्कार, पोषक वातावरण मिळणाऱ्या घरातील मुलंही वाहवत का चालली आहेत? ह्याला निव्वळ एक कारण आहे. ते म्हणजे समजूतदारपणा येण्याआधीच टेक्नॉलॉजीच्या अति आहारी जाणे.
सध्या बॉलिवूड वगैरे पेक्षाही जास्त चालणारे कंटेन्ट क्रिएटर्स म्हणजे सोशल मिडिया इनफ्ल्यूएन्सरर्स. त्यांच्या संकल्पनेतच इनफ्ल्यूएन्स शब्द आहे. त्यांच्या विचारांनी ते तरुणांवर प्रभाव पाडतात. शाळा- कॉलेजातील तरुण वर्ग यांचा टारगेट ऑडियन्स आहे. त्यांचे व्हिडिओ विविध स्पेशल इफेक्ट्स देऊन फार प्रभावी तयार केले जातात. आणि कोवळ्या वयातील मुलं-मुली त्याला बळी पडतात. पालकांचे ऐकणे बंद करतात. कपडेही इनफ्ल्यूएन्सरर्स प्रमाणे घालायला सुरवात करतात. खाण्याच्या सवयी पासून, बोलायच्या पद्धती पर्यंत सगळं या इनफ्ल्यूएन्सरर्सच्या अनुसार करतात. नंतर पश्चाताप करायची वेळ येते. भारतातीलच नाही तर, भारताबाहेरील वेस्टर्न विचार तुमच्या पाल्यात रुजवणारे इनफ्ल्यूएन्सरर्स जास्त धोकादायक आहेत. हेटरेट वाढवणाऱ्या इनफ्ल्यूएन्सरर्सना तरूण पिढी स्वत:चा आदर्श मानायला लागली आहे. हे कंन्टेंटच्या नावाखाली धर्मभेद जातीभेद आणि कट्टरता अशा संकल्पना पौगंडाअवस्थेतील मुलांमध्ये पसरवतात. मुलांच्या विचारसरणीला चुकीचा आकार मिळतो.
एका वयाच्या टप्प्यानंतर या मुलांचे विचार बदलणे शक्य नाही. यातून मग मुलांना मानसिक आजार होतात. आत्महत्यांपर्यंत हे विचार मुलांना घेऊन जातात. ही सोशल मिडियाच्या आहारी जाणारी पिढी ब्रेनवॉश होत आहे. 'माय लाइफ माय चॉइस' या विचाराचा गैरफायद्यामुळे, शिष्टाचार समाजातून नाहीसा होत चालला आहे. मुलांना या अशा इनफ्ल्यूएन्सरर्सच्या अहारी जाण्यापासून रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांना घरचे वातावरण प्रसन्न ठेवावे लागेल. पाल्याशी सुसंवाद साधा. त्यांची मते ऐका त्यांच्या समस्या जाणून घ्या. पिढीनुसार विचारच नाही तर समस्याही बदल्या आहेत. पालक मुलांच्या समस्यांना चोचले किंवा फालतुगिरी समजतात. तसे न करता त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. अल्पवयीन पाल्यावर लक्ष ठेवा. त्यांचा मित्र परिवार चांगला असणे गरजेचे आहे. शिवाय त्याच्याशी ते कोणता कंन्टेन्ट बघतात? का बघतात? यावरही चर्चा करा.