आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक चित्रविचित्र घटनांबाबत ऐकलं असेल. चोरी करण्यासाठी कोणत्याही पातळीला जाण्याची त्यांची तयारी असते. पण चोरीसाठी गेलेलं असताना समजा चोराला भूक लागली तर तो काय करेल? असा विचार तुम्ही कधी केलाय का? सोशल मीडियावर एक विनोदी चोरीचा मामला व्हायरल होत आहे. भूक लागल्यानंतर चोरी बाजूला ठेवून त्यानं चक्क किचनमध्ये खिचडी बनवायला सुरूवात केली. (Due to making khichdi while stealing people were shocked after known this)
जगात प्रत्येकामध्ये नक्कीच काही ना काही गुण असतो. हे गुण माणसाला प्रसिद्धीच्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात, पण कधी-कधी या गुणांमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून जावे लागते, असाच काहीसा प्रकार आसाममधून समोर आला आहे. एका चोराला त्याच्या स्वयंपाकाच्या कौशल्यामुळे तुरुंगात जावे लागले.
रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण आसाममधील आहे जिथे एकजण चोरीच्या इराद्याने घरात शिरला आणि घराबाहेर पडल्यानंतर सामान चोरण्यासाठी गेला आणि त्याच वेळी त्याला भूक लागली. त्यानं तिथेच काहीतरी खाण्याचा विचार केला आणि ही त्याची सर्वात मोठी चूक ठरली. किचनमध्ये त्याला जेवण बनवताना पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
सर्दी, खोकला झालाय; अधून मधून घसाही दुखतो? रोजचा त्रास टाळण्यासाठी काय खायचं काय टाळायचं; वाचा
मंगळवारी, आसाम पोलिसांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून या घटनेचे सर्व तपशील शेअर केले. पोलिसांनी ट्विट करून लिहिले, 'धान्य चोरीचे धक्कादायक प्रकरण! अनेक आरोग्य फायदे असूनही, चोरीचा प्रयत्न करताना खिचडी शिजवणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. चोराला अटक करण्यात आली आहे आणि गुवाहाटी पोलीस (@GuwahatiPol) त्याला गरम जेवण देत आहेत.
डार्क सर्कल्समुळे चेहरा थकल्यासारखा, वयस्कर वाटतोय? 'या' उपायांनी चुटकीसरशी मिळेल काळेपणापासून सुटका
2017 मध्ये अमेरिकेत अशीच एक घटना समोर आली होती. एक चोर पैसे चोरण्याच्या उद्देशाने रेस्टॉरंटमध्ये पोहोचला, पण तो तिथे पोहोचताच स्वयंपाक करायला लागला. मात्र, या प्रकरणात तो चोरीमध्येही यशस्वी झाला होता, जाण्यापूर्वी 5 सँडविच, सोडा पिऊन तो निघून गेला होता.