Lokmat Sakhi >Social Viral > सोच अपने बारे में, तू देगा क्या जवाब? मुंबईकर रिक्षाचालकाच्या लेकीचं जबरदस्त रॅप

सोच अपने बारे में, तू देगा क्या जवाब? मुंबईकर रिक्षाचालकाच्या लेकीचं जबरदस्त रॅप

प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या १५ वर्षांच्या सानियाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 04:03 PM2021-12-23T16:03:09+5:302021-12-23T16:06:42+5:30

प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या १५ वर्षांच्या सानियाची गोष्ट

Thinking about yourself, what would you answer? Mumbaikar autorickshaw driver's rap Sania mistri rapper girl | सोच अपने बारे में, तू देगा क्या जवाब? मुंबईकर रिक्षाचालकाच्या लेकीचं जबरदस्त रॅप

सोच अपने बारे में, तू देगा क्या जवाब? मुंबईकर रिक्षाचालकाच्या लेकीचं जबरदस्त रॅप

Highlightsऐका या मुलीचे एकाहून एक भन्नाट रॅप सॉंगहालाखीच्या परिस्थितीतही स्वत:ची आवड जपत वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तरुणीची धडपड

सोच अपने बारे में, तू देगा क्या जवाब? हे जबरदस्त रॅप करत एक १५ वर्षांची तरुणी आपल्याला स्वत:चा आणि आजुबाजूच्या परिस्थिचा विचार करायला लावते. २०१९ मध्ये ऱणविर सिंग आणि आलिया भट यांचा ‘गली बॉय’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि कधीही रॅप सॉंग न ऐकणारे लोकही रॅप ऐकायला लागले. मुंबईसारख्या शहरातून गल्ली-बोळांतून असंख्य रॅपरना या चित्रपटामुळे प्रेरणा मिळाली. इतकेच नाही तर अनेक तरुणांमध्ये दडलेली ही आगळीवेगळी कला यानिमित्ताने समोर आली. मुंबईच्या गोवंडी भागात राहणाऱ्या सानिया मिस्त्री या रॅपर तरुणीची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी ठरत आहे. इतक्या लहान वयात आणि प्रतिकूल परिस्थितीत रॅपर म्हणून ओळख मिळवणारी सानिया वयाच्या ८ व्या वर्षापासून गात होती. १३ व्या वर्षापासून ती रॅप सॉंग म्हणायला लागली. 'गली गर्ल' अशी तिची नवीन ओळख निर्माण झाली असून तिच्या या कलेचे सर्वच स्तरात कौतुक होताना दिसत आहे. 

प्रतिकूल परिस्थिती व्यक्तीला काहीतरी करण्याची प्रेरणा देते असे म्हणतात ते खोटे नाही. सानियाचे वडील रिक्षाचालक आहेत तर तिची आई दैनंदिन खर्चासाठी काही लहान मोठी कामे करते. एकूण सानियाच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. ११ वी मध्ये असणाऱ्या सानियाकडे स्मार्टफोनही नाही. पण आपल्या मित्रमंडळींच्या साह्याने ती आपली रॅप सॉंगची आवड जपत आहे. आपल्या गाण्यांचे ती व्हिडियो करते आणि तिचे हे व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सानियाच्या युट्यूब चॅनेलचे नाव Saniya MQ असून तिचे आतापर्यंत ३ हजार फॉलोअर्स आहेत. तिचे इन्स्टाग्राम हँडलही असून त्यावरही ती आपले व्हिडियो पोस्ट करत असते. सानियाच्या रॅप साँगवर तिच्या आजुबाजूला राहणाऱ्यांनी बरेच प्रश्न उपस्थित केले. मात्र तिच्या आईने मात्र तिच्या या कलेचे समर्थन करत तिला कायम प्रोत्साहन दिल्याचे ती सांगते. कालांतराने लोकांनी तिच्यातील या कलेचे कौतुक करायला सुरुवात केली. यामुळे सानियाचा आत्मविश्वास वाढला आणि तिला आपली कला आणखी चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आणावी असे वाटले. 


 

सानिया आपल्या रॅप सॉंगमधून समाजासमोर मांडत असलेले विषय आपल्याला विचार करायला भाग पाडणारे आहेत. ती म्हणते, मला आणि माझ्या मित्रमंडळींना गरीबीमुळे कायम भेदभावा सहन करावा लागला आहे. तुम्ही आयुष्यात काहीही करु शकणार नाही असे त्यांना वारंवार सांगितले जाते. मात्र आपण गरीब घरातले असल्याने आपल्याला याचा सामना करावा लागत असल्याचे सानिया अतिशय खेदाने सांगते. पण माझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि देवाच्या कृपेनी एक दिवस ही स्वप्न नक्की खरी होतील असे सानिया सांगते. आपण काय करतो आहोत हे आपल्या पालकांना कितीतरी काळ माहितच नसल्याचे ती सांगते. ऱॅप काय आहे हे लोकांना माहित नव्हते. रॅप कसे करतात, मला ते करायला खूप आवडते हे मला लोकांना समजावून सांगावे लागत होते. कालांतराने माझ्या आईलाही हा प्रकार आवडला. पण माझ्या या आवडीबाबत जग काय विचार करेल हा महत्त्वाचा प्रश्न होता. पण आता माझे पालक, शिक्षक यामध्ये माझ्यासोबत आहेत, त्यामुळे ही कला मी कायम करणार आहे. तिच्या या सगळ्या प्रवासात तिचे मित्रमैत्रीणी तिला अतिशय उत्तम साथ देत असल्याचे ती वारंवार सांगते. त्यामुळ येत्या काळात रॅप सॉंंगच्या या दुनियेत मुली दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको.

Web Title: Thinking about yourself, what would you answer? Mumbaikar autorickshaw driver's rap Sania mistri rapper girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.