सध्या सोशल मीडियावर भारत पाकिस्तानातील प्रेमी जोडप्यांच्या लव्हस्टोरीज व्हायरल होत आहेत. यात आणखी एक आगळी वेगळी प्रेमकहाणी चर्चेत आली आहे. ज्या व्यक्तीनं आपला फोन चोरला त्याच व्यक्तीच्या प्रेमात ही तरूणी आहे. वाचायला विनोदी वाटत असलं तरी खरंच असं घडलंय . ब्राझीलमधील या जोडप्याने ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितले. (This Brazilian woman fell in love with a man who stole her phone. Their 'love story' is viral)
इमॅन्युएला नावाची महिला तिच्या फर्स्ट डेटबद्दल म्हणाली, “मी एकटीच रस्त्याने चालत होते. त्याच भागात तो राहत होता. एकदम माझ्या लक्षात आलं कीमाझा फोन चोरीला गेला.'' इकडे फोन चोरणाऱ्याची वेगळीच कथा. तिचे फोटो पाहून तो तिच्या प्रेमातच पडला.फोनमधील तिचे फोटो पाहून त्याचे मन बदलले आणि तो इम्प्रेस झाला. त्याने तिला भेटण्याचा प्रयत्न केला आणि तिची प्रशंसा केली की पहिल्यांदा अशी सुंदर मुलगी पाहिली. पण तिचाच फोन चोरी केला, यााबाबत चोराला पश्चाताप झाला.
ही लव्ह स्टोरी व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आता गेल्या २ वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. 'प्रेम हे प्रेम' असतं अशी कमेंट एका युजरने केली आहे. प्रेम कुठेही, कसंही फुलवता येतं अशी कमेंट एका युजरकडून आली आहे. २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. हजारो लोकांनी या लव्हस्टोरीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.