Lokmat Sakhi >Social Viral > बार्बीसारखं दिसायचं या वेडापायी 'तिने' खर्च केले ५३ लाख, परिणाम असा विचीत्र झाला की...

बार्बीसारखं दिसायचं या वेडापायी 'तिने' खर्च केले ५३ लाख, परिणाम असा विचीत्र झाला की...

एका वर्षात ३ वेळा केली ब्रेस्टवर सर्जरी, सुंदर ओठांसाठी शस्त्रक्रिया केली..पण चेहरा झाला असा विद्रूप की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 03:10 PM2022-05-06T15:10:55+5:302022-05-06T15:20:42+5:30

एका वर्षात ३ वेळा केली ब्रेस्टवर सर्जरी, सुंदर ओठांसाठी शस्त्रक्रिया केली..पण चेहरा झाला असा विद्रूप की

This crazy 'she' who looks like Barbie spent 53 lakhs, the result was strange ... | बार्बीसारखं दिसायचं या वेडापायी 'तिने' खर्च केले ५३ लाख, परिणाम असा विचीत्र झाला की...

बार्बीसारखं दिसायचं या वेडापायी 'तिने' खर्च केले ५३ लाख, परिणाम असा विचीत्र झाला की...

Highlightsआपल्याला देशात सर्वात सुंदर ओठ हवे असल्याने आपण ही सर्जरी केल्याचे जेसिका सांगते. तिने ३ वर्षात ३ वेळा सर्जरी केली आहे. सर्जरीनंतर आपल्याला जास्त आत्मविश्वास आल्यासारखे वाटत असल्याचे जेसिका सांगते

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक महिलेला वाटते. आपला रंग गोरापान, केस लांबसडक, नाक धारधार आणि फिगर शेपमध्ये असेल तरच आपण सुंदर दिसतो असे अनेकींना वाटते. त्यासाठी कोणी मेकअप करते तर कोणी डाएट आणि व्यायाम करुन फिगर बनवते. काही जण तर सुंदर दिसण्यासाठी प्लास्टीक सर्जरीही करतात. ऑस्ट्रीयामधील जेसिका नावाच्या मॉडेलने बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी थोडेथोडके नाही तर तब्बल ५३ लाख रुपये खर्च केले आहेत. आता इतका खर्च येण्याचे कारण काय, तर तिने अतिशय महागडी अशी कॉस्मेटीक सर्जरी केली आहे. या मॉडेलचे वय अवघे २१ वर्ष असून तिने सर्जरीनंतर सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

(Image : Google)
(Image : Google)

ऑस्ट्रीयामधील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जेसिकाने ब्रेस्ट, पृष्ठभाग आणि ओठांचा आकार वाढविण्यासाठी सर्जरी केल्यानंतर तिच्या परिवाराने तिच्याशी बोलणे बंद केले आहे. तिच्यासोबतचे नाते त्यांनी तोडले असल्याची माहिती समोर आली आहे. माझ्या परिवाराने मला अशाप्रकारे वाळीत टाकल्याने ही माझ्यासाठी दु:खद बाब झाली आहे. मला माझ्या परिवाराच्या संपर्कात राहायचे असून त्यांनी माझा मोबाईल नंबर ब्लॉक केला आहे. मी त्यांना मेसेज करत असून त्यांच्याकडून कोणत्याहीप्रकारचा प्रतिसाद येत नाही. 

(Image : Google)
(Image : Google)

जेसिकाने वयाच्या १८ व्या वर्षी आपल्या शरीरात सर्जरीने बदल करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून तिच्या ब्रेस्टवर ३ सर्जरी झाल्या आहेत. म्हणजेच तिने ३ वर्षात ३ वेळा सर्जरी केली आहे. सर्जरीनंतर आपल्याला जास्त आत्मविश्वास आल्यासारखे वाटत असल्याचे जेसिका सांगते. सर्जरीच्या आधी जेसिकाचे छोटे काळे केस होते. तर तिने शरीरावर अनेक ठिकाणी टोचले होते. आपल्याला देशात सर्वात सुंदर ओठ हवे असल्याने आपण ही सर्जरी केल्याचे जेसिका सांगते. वयाच्या १७ व्या वर्षी आपण घर सोडल्याचे जेसिका सांगते. असे असले तरी बार्बीसारखे दिसण्यासारखे तिने इतके पैसे खर्च केल्याने सोशल मीडियावर तिच्यावर बरीच चर्चा होत आहे. 

Web Title: This crazy 'she' who looks like Barbie spent 53 lakhs, the result was strange ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.