घरात झुरळं झाली असतील, तर त्यासाठी बाजारात अनेक केमिकल्स उपलब्ध आहेत. पण हे केमिकल्स एकदा घरात फवारले की त्याचा वास २ ते ३ दिवस तरी जात नाही. शिवाय घरात जर लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती असतील, तर त्यांच्यासाठी हा वास जास्तच त्रासदायक ठरतो आणि मुळात लहान मुलं घरात असताना हा उपाय करणंही जरा धोकादायक वाटतं. म्हणूनच झुरळांना घराबाहेर काढण्यासाठी हा एक भन्नाट उपाय करून बघा (How to get rid of Cockroach?). यामुळे तुमच्या घरात मस्त सुगंध दरवळेल आणि घर झुरळमुक्त होईल, हे विशेष. (This frangnance will help you to get rid of Cockroach)
झुरळांना घराबाहेर काढण्याचा घरगुती उपाय१. हा उपाय इन्स्टाग्रामच्या beauty.brains.insta या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
२. हा उपाय करण्यासाठी आपल्याला उदबत्ती, कापूर आणि मिरेपूड अशा फक्त ३ गोष्टी लागणार आहेत.
३. सगळ्यात आधी ३ ते ४ उदबत्त्या घ्या. त्याचा जो काळा भाग असतो, तो काढून एका वाटीत जमा करा. काड्या टाकून द्या.
४. त्यानंतर त्याच वाटीमध्ये ५ ते ६ कापूराच्या वड्या किंवा गोळ्या टाका.
५. आता कापूर आणि उदबत्तीचा काळा भाग हे व्यवस्थित कुटून त्याची पावडर करून घ्या. अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यात ही पावडर टाका. त्याता २ ते ३ चिमूटभर मिरेपूड टाका. या मिश्रणावर झाकण ठेवा आणि ते रात्रभर तसंच राहू द्या.
६. दुसऱ्यादिवशी सकाळी हे पाणी गाळून घ्या. त्यात कापसाचे बोळे बुडवून ओले करा. थोडेसे पिळून घ्या आणि तुमच्या घरात ज्या ठिकाणी झुरळांचा वावर जास्त असतो, त्याठिकाणी ते ठेवून द्या. या मिश्रणाच्या वासाने झुरळं त्या जागेवर फिरकणार नाहीत. झुरळं कमी होईपर्यंत दर २ ते ३ दिवसांतून एकदा हा उपाय करून बघा.