Lokmat Sakhi >Social Viral > नवरात्रीत रुजवण घालण्याची पाहा ‘ही’ सोपी पद्धत, येईल हिरवागार कोवळा सुंदर बहर...

नवरात्रीत रुजवण घालण्याची पाहा ‘ही’ सोपी पद्धत, येईल हिरवागार कोवळा सुंदर बहर...

Importance Of Sown Barley In Shardiya Navratri : This Is How Grain Should Be Sown During Navratri : घटस्थापनेच्या दिवशी घातलेले रुजवण चांगले वाढण्यासाठी टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 04:49 PM2024-09-27T16:49:41+5:302024-09-27T17:07:15+5:30

Importance Of Sown Barley In Shardiya Navratri : This Is How Grain Should Be Sown During Navratri : घटस्थापनेच्या दिवशी घातलेले रुजवण चांगले वाढण्यासाठी टिप्स...

This Is How Grain Should Be Sown During Navratri Importance Of Sown Barley In Shardiya Navratri | नवरात्रीत रुजवण घालण्याची पाहा ‘ही’ सोपी पद्धत, येईल हिरवागार कोवळा सुंदर बहर...

नवरात्रीत रुजवण घालण्याची पाहा ‘ही’ सोपी पद्धत, येईल हिरवागार कोवळा सुंदर बहर...

शारदीय नवरात्रौत्सव (Navratri 2024) लवकरच सुरु होणार आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीची पूजा केली जाते. देशभरात हे नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजेच कलशाची स्थापना करुन धान्यांची पेरणी केली जाते.नवरात्रीच्या काळात मातीच्या मडक्यात धान्य पेरण्याची परंपरा (What Is The Importance Of Growing Grain During Navratri) शतकानुशतके चालत आली आहे. या दिवशी घरोघरी घट देखील बसवले जातात. घटस्थापना करताना सात प्रकारच्या धान्यांची पेरणी केली जाते, यालाच 'सप्तधान्य' असे म्हटले जाते. या सप्तधान्यांत प्रामुख्याने गहू, जव, तीळ, धान, मूग, बाजरी, चणे यांचा समावेश असतो(Importance Of Sown Barley In Shardiya Navratri).

बऱ्याचशा घरांमध्ये किंवा देवीच्या मूर्तीच्या बाजूला आपण धान्यांचे रुजवण घातलेलं पाहतो. हे रुजवण घालताना विशेष काळजी घ्यावी लागते. काहीवेळा या घातलेल्या रुजवणाची काळजी घेऊन सुद्धा ते व्यवस्थित उगवून येत नाही. हे धान्यांचे रुजवण संपूर्ण नऊ दिवस देवीच्या बाजूलाच ठेवावे लागते. हे सप्तधान्यांचे रुजवण घालताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात(This Is How Grain Should Be Sown During Navratri).

धान्यांचे रुजवण घालताना कोणती काळजी घ्यावी ?

१. सर्वातआधी एक मातीचे भांडे घेऊन ते संपूर्णपणे पाण्यांत भिजवून ओले करुन घ्यावे. त्यानंतर, थोडीशी माती आणि वाळू घेऊन ती स्वच्छ चाळून घ्यावी. 
२. चाळून घेतलेली माती आणि वाळू एका बाजूला ठेवून द्यावे. आता या मातीवर थोडे पाणी शिंपडून माती आणि वाळू हलकीच ओली करुन घ्यावी. 
३. आता मातीचे भांडे घेऊन त्याच्या तळाशी हलकी ओली करुन घेतलेली माती घालावी. 
४. आता हे सप्तधान्य घेऊन ते व्यवस्थित या ओल्या मातीवर पसरवून घ्यावे. सप्तधान्य शक्यतो आदल्या रात्री थोड्याशा पाण्यांत भिजत ठेवावं. सप्तधान्य पाण्यांत ६ ते ७ तास भिजत ठेवल्याने ते चांगल्या प्रकारे रुजण्यास मदत होते. याचबरोबर ते चांगले लांबलचक उगवूनही येते. असे भिजवून घेतलेले सप्तधान्य मातीवर पसरवून घ्यावे. 

फक्त १ कप सीताफळाचा गर वापरून १० मिनिटांत करा सीताफळ फ्रुट क्रिम, मुलांसाठी खास पदार्थ...

भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं फेकून देण्यापेक्षा बाल्कनीतील रोपांसाठी करा खास खत, रोपं येतील बहरुन... 
५. त्यानंतर त्यावर कोरड्या वाळूचा एक हलका थर पसरवा आणि धान्य किंचित झाकून ठेवा. लक्षात ठेवा की धान्य वाळूच्या खूप जाड थराने झाकून ठेवू नका यामुळे धान्य उगवून येण्यास त्रास होईल. 
६. आता मातीचे भांडे एका छोट्या डिशने  झाकून एक-दोन दिवस ठेवावे. त्याचबरोबर सुरुवातीचे काही दिवस हे भांडे शक्यतो काळोखात ठेवावे यामुळे धान्य लगेच उगवून येण्यास मदत होते. 
७. या रुजवणाला पाणी घालताना शक्यतो त्या पाण्यात १ टेबलस्पून हळद मिक्स करुन घालावी. असे हळदीचे पाणी रुजवणाला घातल्यास धान्य लगेच उगवून येण्यास मदत होते, त्याचबरोबर या रोपांचा रंग छान गर्द हिरवागार होतो.  

अशाप्रकारे आपण नवरात्रीचे हे रुजवण घालताना काही छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर ते चांगले उगवून येण्यास मदत होते.

Web Title: This Is How Grain Should Be Sown During Navratri Importance Of Sown Barley In Shardiya Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.