बऱ्याच जणांना च्युइंगम खाण्याची सवय असते. च्युइंगम खाल्ल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही. अनेक जण श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी च्युइंगम चघळतात. तर काही लोकं तोंडाचा व्यायाम व्हावा यासाठी चघळतात. च्युइंगम खाल्ल्यानंतर ते योग्यरित्या फेकून देणं तितकेच गरजेचं आहे.
अनेकदा लहान मुळे च्युइंगम खातात, व कुठेही फेकून देतात. त्याचा डिंक बरेच दिवस तसाच राहतो, ज्यामुळे कपड्यांना किंवा आपल्या केसांना चिकटतो. चिकटलेले च्युइंगम सहसा लवकर निघत नाही. ज्यामुळे केस किंवा कापड कापण्याची स्थिती निर्माण होते. च्युइंगम सहजरित्या काढायचे असेल तर, या कांही टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे नक्कीच च्युइंगम सहज निघून जाईल(This is how you can easily remove chewing gum from hair and clothes).
केस व कपड्यांमधून च्युइंगम काढण्यासाठी टिप्स
बर्फ
केसांमधून च्युइंगम काढणे खूप त्रासदायक ठरते. यासाठी आपण बर्फाची मदत घेऊ शकता. च्युइंगम केस, शूज किंवा कपड्यांवर चिकटले असेल तर, बर्फाचा वापर करून पाहा. च्युइंगम चिकटलेल्या ठिकाणी बर्फ चोळा. काही मिनिटे असच करत राहा. या उपायामुळे च्युइंगम सहज निघून जाईल.
ऑफिसमध्ये दुपारी झोप येते? ३ सोप्या ट्रिक्स, झोप चटकन उडेल
व्हिनेगर
व्हिनेगरच्या मदतीने आपण चिटकलेला च्युइंगम काढू शकता. यासाठी मायक्रोवेव्हमध्ये व्हिनेगर गरम करा. यानंतर, ज्या ठिकाणी च्युइंगम चिटकला आहे त्या ठिकाणी लावा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने घासून काढा. या उपायामुळे च्युइंगम सहज निघेल.
हेअर ड्रायर
केस किंवा कपड्यांवर च्युइंगम चिकटला असेल तर, घाबरू नका. आपण च्युइंगम काढण्यासाठी हेअर ड्रायरची मदत घेऊ शकता. च्युइंगम चिकटलेल्या जागेवर हेअर ड्रायरने जागा कोरडी करा. त्यातून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे त्याची पकड हलकी होते. ज्यामुळे च्युइंगम सहज निघेल.
ना डोक्यावर छप्पर ना पोटाला अन्न, ‘तिचा’ एक निर्णय आणि झाली कोट्यवधींची मालकीण..
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. बेकिंग सोड्याचा वापर किचनमधील पदार्थ व कपड्यांवरील डाग काढण्यासाठी केला जातो. याचा वापर आपण च्युइंगम काढण्यासाठी देखील करू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. व हे मिश्रण च्युइंगमवर लावा, यामुळे च्युइंगम सहज निघेल.