Lokmat Sakhi >Social Viral > बघावं ते नवलंच! लेकीसह आई, सासू, आजीही गर्भवती, पाहा व्हायरल व्हिडिओची गोष्ट

बघावं ते नवलंच! लेकीसह आई, सासू, आजीही गर्भवती, पाहा व्हायरल व्हिडिओची गोष्ट

Three generations of a family strike poses for heartwarming maternity shoot ३ पिढ्यांच्या प्रेग्नन्सीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2023 08:28 PM2023-03-18T20:28:53+5:302023-03-18T20:30:45+5:30

Three generations of a family strike poses for heartwarming maternity shoot ३ पिढ्यांच्या प्रेग्नन्सीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल..

Three generations of a family strike poses for heartwarming maternity shoot | बघावं ते नवलंच! लेकीसह आई, सासू, आजीही गर्भवती, पाहा व्हायरल व्हिडिओची गोष्ट

बघावं ते नवलंच! लेकीसह आई, सासू, आजीही गर्भवती, पाहा व्हायरल व्हिडिओची गोष्ट

गेल्या काही दिवसांपासून फोटोशूटची हवा आहे. लग्न असो किंवा मॅटरनिटी, प्री - फोटोशूटचं ट्रेण्ड सध्या चर्चेत आहे. प्री वेडिंग फोटोशूट, लग्नाचे फोटोशूट अगदी प्रेग्नसी आणि मॅटरनिटी फोटोशूट लोकं उत्साहात करीत आहे. या फोटोशूटचे विविध प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल होत राहतात. फोटोशूटसाठी भन्नाट आयडिया देखील शोधल्या जातात. पण सध्या एक प्रेग्नन्सी फोटोशूट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोशूटमध्ये सुनेसह चक्क घरातील इतर बायकाही गरोदर असल्याचं दिसून येत आहे. नक्की प्रकरण काय आहे, पाहूयात(Three generations of a family strike poses for heartwarming maternity shoot).

घरात तान्ह्या मुलाचं आगमन होणार आहे, हे कळताच घरातील सदस्यांमध्ये हर्ष-उल्हास होतो. या एका बातमीने घरात सगळ्यांचं प्रमोशन होतं. जी बायको असते ती आई होणार असते, नवरा बाबा, सासू-सासरे आजी-आजोबा. पण आपण कधी पाहिलं आहे का? सुनेसह तिची आई, तिची सासू, तिची आजी गरोदर राहिली आहे. ऐकून शॉक बसला ना. पाहा फोटोशूट..

काय आहे नेमकं प्रकरण?

जीबिन जॉय हा फोटोग्राफर आहे. तो बाबा होणार आहे, हे कळताच त्याने बायकोसाठी हटके मॅटरनिटी फोटोशूट करायचे ठरवलं. एक दिवस तो पिक्चर पाहत असताना, त्याला या मॅटरनिटी फोटोशूटची भन्नाट कल्पना सूचली. बायको चिंचू पीएस या फोटोशूटसाठी खूप उत्सुक होती. कारण यात तिच्यासोबत तिची आई, सासू आणि आजी एकत्र गर्भवती दाखवण्यात आली आहे.

खरं तर हा सगळा खटाटोप हटके फोटोशूटसाठी करण्यात आला होता. इथे फक्त लेकच गर्भवती आहे. बाकी आई, सासू आणि आजीने उशी लावून या फोटोशूटमध्ये भाग घेतला. आता हे हटके फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

इंडियन एक्स्प्रेस या वेबसाईटसह बोलताना जिबिन म्हणाला, ''माझे आजोबा फोटोशूटबद्दल खूप उत्साही होते. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती, त्यांनी नाटकांमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी त्यांनी दिग्दर्शक बेसिल जोसेफच्या जेन मॅनमध्ये काम केले होते. जॉर्ज चाको म्हणाले, “शूटचा भाग बनून मला खूप आनंद झाला. ते अजिबात अवघड नव्हते. चार पिढ्या झाल्या आहेत, आता आम्ही सर्वात धाकट्या सुनेच्या बाळाची वाट पाहत आहोत.''

Web Title: Three generations of a family strike poses for heartwarming maternity shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.