Lokmat Sakhi >Social Viral > पेटता बाण ‘तिनं’ पायानं मारला, केला अचूक लक्ष्यभेद! पाहा व्हिडिओ- खाली डोकं-वर पाय

पेटता बाण ‘तिनं’ पायानं मारला, केला अचूक लक्ष्यभेद! पाहा व्हिडिओ- खाली डोकं-वर पाय

Viral Video: योगा करत करत केलेली ही नेमबाजी आणि ती देखील पायांनी... एकदा बघितलाच पाहिजे, असा आहे हा व्हिडिओ, प्रचंड थ्रिलिंग (aiming fire arrow with legs)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 12:45 PM2022-07-11T12:45:43+5:302022-07-11T12:47:32+5:30

Viral Video: योगा करत करत केलेली ही नेमबाजी आणि ती देखील पायांनी... एकदा बघितलाच पाहिजे, असा आहे हा व्हिडिओ, प्रचंड थ्रिलिंग (aiming fire arrow with legs)

Thrilling Video: Women aimed fire arrow correctly with the help of her feet, Must watch | पेटता बाण ‘तिनं’ पायानं मारला, केला अचूक लक्ष्यभेद! पाहा व्हिडिओ- खाली डोकं-वर पाय

पेटता बाण ‘तिनं’ पायानं मारला, केला अचूक लक्ष्यभेद! पाहा व्हिडिओ- खाली डोकं-वर पाय

Highlightsएक्साईटमेंट, थ्रील आणि इन्स्पिरेशन असं सगळंच या एका व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे थोडा वेळ काढून आवर्जून बघायलाच हवा हा काही सेकंदांचा व्हिडिओ.

सोशल मिडियावर आजकाल कोणती गोष्ट व्हायरल (viral video on social media) होईल, काहीच सांगता येत नाही. पण तरीही त्यातल्या त्यात असे अनेक व्हिडिओ असतात, जे खरोखरंच खूप एक्सायटिंग असतात. काही व्हिडिओमध्ये जबरदस्त थ्रील (thrilling video of aiming fire arrow) असतं तर काही व्हिडिओ अतिशय प्रेरणादायी असतात. आता सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एक्साईटमेंट, थ्रील आणि इन्स्पिरेशन (exciting viral video) असं सगळंच या एका व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे थोडा वेळ काढून आवर्जून बघायलाच हवा हा काही सेकंदांचा व्हिडिओ. (aiming fire arrow with legs)

 

धनुष्यबाण चालवणे हे अतिशय कौशल्याचं काम. हाताने जरी धनुष्यबाण अचूक ठिकाणी निशाणा साधत मारायचा असेल, तरी त्यासाठी आपण त्या कलेत खूप पारंगत असावं लागतं. पण इथे तर एका तरुणीने कमालच केली आहे. तिने हाताने नाही, तर चक्क पायाने धनुष्यबाण चालवला आहे. बरं तो धनुष्यबाण काही साधासुधा नव्हता. त्या धनुष्यबाणाच्या टोकाला आग लावलेली होती. म्हणजेच आपण त्याला अग्नीबाणही म्हणू शकतो. पायाने मारलेला हा बाण घेताना तिने नेमकी कशी पोझिशन घेतली होती, ते देखील खरोखरंच पाहण्यासारखं आहे. 

 

हा व्हिडिओ हरिद्वारचा असून Dr Jaideep Arya यांच्या @swabhimani1 या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. योग: कर्मसु कौशलम... अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. अवघ्या काही तासांपुर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला तब्बल 397.6K व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एक तरुणी हातावर जोर देऊन खाली डोकं- वर पाय अशा अवस्थेत आहे. तिचा एक पाय वर आणि एक पाय गुडघ्यात वाकवलेला असून दोन्ही पायांच्या बोटांनी तिने एक धनुष्यबाण पेलून धरला आहे. वर असणारे पाय ती हळूहळू कंबरेत वाकून पुढच्या दिशेला आणते आणि समोरच्या बाजूने निशाणा साधत अचूक लक्ष्यभेद करते. तिने ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे, ते खरोखरंच अतिशय थक्क करणारं आहे. हा व्हिडिओ बघून अक्षरश: हजारो लोकांनी या तरुणीचं कौतूक केलं आहे. 
 

Web Title: Thrilling Video: Women aimed fire arrow correctly with the help of her feet, Must watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.