Join us  

लाखो दिलांची सुपरहॉट मलिका, तिनं इन्स्टावरच सांगितली आजारी मनाची ‘खरी’ गोष्ट! रडली जगजाहीर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 11:47 AM

सुपर मॉडेल बेला हदीदची (bella hadid) 'रिअल' पोस्ट व्हायरल, मेंटल स्ट्रेसचा उद्रेक. आपलं कसं भारी चाललं आहे हे दाखवण्याच्या नादात, सोशल मीडियावर हसरे फोटो टाकता, प्रत्यक्षात एकदम डाऊन? किती फसवणार स्वत:ला?

ठळक मुद्देमानसिक तणावांचा सामना तुम्ही कोणीही असाल तरी आयुष्याच्या एका टप्प्यावर करावाच लागतो. तुम्ही स्वत:च यातून स्वत:ला बाहेर काढू शकता

प्रत्येक जण सध्या कोणत्या ना कोणत्या तणावाचा सामना करत आहे. हा तणाव अभिनेते आणि अभिनेत्री यांच्यापासूनही फार दूर नाही. करोडो रुपयांची मालक असलेले या सिताऱ्यांनाही आपल्याप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यावर ताणाचा सामना करावा लागतो. अनेक जण त्यावर उघडपणे भाष्यही करताना दिसतात. अनेकदा ते आपल्या डिप्रेशनविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलताना दिसतात. सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात जास्त पैसे कमावणारी मॉडेल म्हणून ओळख असलेली अमेरिकन मॉडेल बेला हदीद ( bella hadid) हिनेही नुकतेच याबाबत वक्तव्य केले असून आपल्या मानसिक स्थितीबाबत उघडपणे भाष्य केले आहे. आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर एका व्हिडियोला लाइक करत तिने आपली मानसिक स्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्या व्हिडियोनंतर बेलाने आपले रडणारे काही फोटोही पोस्ट केले आहेत. यावरुन ती सध्या काहीशी डिप्रेशनमध्ये असल्याचे दिसते. (bella hadid)

(Image : Google)
२५ वर्षाच्या बेलाने या पोस्टच्या माध्यमातून तिची असुरक्षितता आणि नकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्ध अमेरिकन सिंगर विलो स्मिथ याचा व्हिडियो शेअर करत बेलाने एक भलीमोठी पोस्ट लिहीली आहे. ती म्हणते, लोक हे विसरतात की प्रत्येकाला असेच हरवल्यासारखे वाटते, आपल्याला नेमके काय हवे असते तेच अनेकदा समजत नाही. प्रत्येक जण अशाप्रकारची अस्वस्थता अनुभवतो. पुढे ती म्हणते, सोशल मीडियावरचे जीवन खरे नाही. लोकांनी आजपर्यंत बेलाला केवळ एक रनवे मॉडेल म्हणून पाहिले आहे. कधी ती ग्लॅमरस फोटोशूट करते तर कधी मॅगझीनच्या फ्रंट पेजवर दिसते. पण सोशल मीडियावर जे दिसते ते खरे नसते. आपल्या रडणाऱ्या फोटोखाली ती लिहीते, ही रोजची बाब आहे, रोजच्या दिवसांची आणि कित्येक वर्षांची. 

बर्नआऊट आणि ब्रेकडाऊनबद्दलही ती बोलते, कोणत्या गोष्टी आनंद देतात आणि कोणत्या गोष्टी दु:ख देतात हे आपण चांगले समजू शकतो असेही पुढे ती म्हणते. तुम्ही स्वत:साठी वेळ काढला तर तुम्ही तुमचा आनंद आणि दु:ख समजू शकता. इथे प्रत्येकजण एकट्याने संघर्ष करत आहे. कधी कधी तुम्हाला तुम्ही एकटे नाही आहात हे स्वत:ला सांगणे आणि आपली सोबत करणे महत्त्वाचे आहे. असे अप-डाऊन, साईज वेज नेहमी असतात. पण प्रत्येक बोगद्याच्या शेवटी प्रकाश असतो हे लक्षात ठेवा असे आशादायक वक्तव्यही बेला करते. तुम्ही तुमचे आनंद, दु:ख, ट्रॉमा, रुटीन सगळे समजून घेऊन त्याच्याशी योग्य पद्धतीने डील करा असेही ती सांगते. बेलाने तिच्या मानसिक स्थितीचा खुलासा कौतुकास्पद ठरत आहे. तिची बहीण गीगी हदीद आणि इतर अभिनेते-अभिनेत्रींनी तिचे अशाप्रकारे ओपनली बोलल्याबद्दल कौतुक केले आहे. 

शेवटी ती सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि म्हणते, मला माहित नाही का पण माझे सत्य मी याठिकाणी शेअर करत आहे. कारण मला हे सगळे खूप कठिण वाटत आहे. बर्नआऊट ही अशी एक समस्या आहे जी केवळ प्रसिद्ध लोकांनाच भेडसावते असे नाही तर सामान्यातील सामान्य व्यक्तीही या समस्येमध्ये अडकू शकतो. आपण करत असलेल्या कामांमध्ये येणाऱ्या तणावांमुळे ही परिस्थिती उद्भवते. ही समस्या दिर्घकाळ तशीच राहिल्यास भविष्यात काही गंभीर मानसिक समस्याही उद्भवू शकतात. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामहॉलिवूड