प्रत्येक घरात ३ ते ४ लोकांचा सतत वावर असतो. त्यामुळे फरशा अस्वच्छ हाेतातच. म्हणूनच त्या रोजच्या रोज स्वच्छ करणं गरजेचं आहेच. ज्या घरात लहान मुलं असतील, त्या घरात तर आणखीनच गोंधळ असतो. मुलांचा पसारा, सतत काही ना काही फरशीवर सांडणं यामुळे मग फरशा जरा जास्तच घाण होतात (How to clean tiles?). आपण त्या दररोज पुसत असलो तरीही हळूहळू फरशांची चमक कमी होत जाते आणि त्या जुनाट होत जातात (How to clean floors perfectly?). तुमच्या घरातल्या फरशांचंही असंच झालं असेल तर हा एक घरगुती उपाय (home remedies) करून बघा...
हा उपाय अगदी सोपा आणि शिवाय स्वस्तात होणारा आहे. याविषयीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या mucherla.aruna या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
व्यायामासाठी वेळच नाही, ५ मिनिटांचे स्ट्रेचिंग करा... बघा फिटनेससाठी तज्ज्ञांनी सांगितलेले ५ व्यायाम
हा उपाय केल्यामुळे फरशांवरचा जुनाटपणा निघून जाईल आणि त्यांना एक नवी चमक मिळेल. त्या अगदी चकचकीत दिसतील. शिवाय हा उपाय करण्याचा आणखी एक दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामुळे घरातल्या मुंग्या, झुरळं आणि इतर किटकांचं प्रमाणही कमी होईल. यामुळे साहजिकच घर स्वच्छ राहण्यास मदत होईल.
फरशा चमकदार होण्यासाठी उपाय१. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो एक खास पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे केरोसीन.
वॉशिंग मशिनमध्ये धुवायला टाकलेल्या शर्टची कॉलर मळकीच राहते? १ सोपा उपाय, कॉलर होईल स्वच्छ
२. नेहमीप्रमाणे फरशी पुसायला जेवढं पाणी घेता, तेवढं पाणी घ्या. त्यात तुम्ही फिनेल किंवा इतर जे कोणतं लिक्विड टाकता, ते ही टाका.
३. या पाण्यात आता फक्त १ टेबलस्पून केरोसीन टाका. सगळं पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि त्या पाण्याने फरशी पुसा.
४. केरोसीनचा वास थोडा वेळ घरात राहील. पण रुम फ्रेशनर मारलं किंवा फिनेलचं प्रमाण वाढवलं तर तो वास जाणवणार नाही.
५. हा उपाय आठवड्यातून ३ वेळा केला तरी चांगला परिणाम दिसून येईल.