Join us  

काय डेंजर आई! ६ वर्षांच्या मुलासाठी तयार केलेल्या कडक शिस्तीच्या टाइम टेबलचा फोटो व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 12:43 PM

Time Table of Son Made by Mother : आई आणि मुलाचे अॅग्रीमेट वाचून तुम्हीही व्हाल थक्क, रोजच्या शेड्यूलबाबत कडक आईवर नेटीझन्सनी केले जोक

ठळक मुद्देयोग्य नियोजन केल्यास मुलांचे शेड्यूल बसण्यास सोयीचे जाते, पण म्हणून त्यासाठी अॅग्रीमेट करणे हे जरा अतीच आहे

मुलांची शाळा सुरू झाली की त्यांचं दिवसभराचं एक रुटीन ठरलेलं असतं. मुलं लहानपणापासून शिस्तीत वागली तर मोठेपणीही त्यांना चांगल्या सवयी लागतात. या हेतुने पालक विशेषत: आई लहानपणापासूनच मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असते. मुलांचं खेळण्याचं, दंगा-मस्ती करण्याचं वय असलं तरी त्यांनी ठराविक वेळेत ज्या-त्या गोष्टी करायला हव्यात असा पालकांचा अट्टाहास असतो. यासाठी पालक अनेकदा मुलांनी सकाळी उठल्यापासून काय आणि कसं करायचं याचं एक शेड्यूल तयार करतात. मुलंही हे शेड्यूल अगदी नीट फॉलो करताना दिसतात. यामुळे मुलांना कोणत्या वेळेला काय करायचे याचा अंदाज राहतो आणि विनाकारण वेळ वाया तर जात नाहीच पण पालकांचीही त्यांच्या मागे लागण्यावरुन चिडचिड होत नाही (mother made time table with her six year old son). 

(Image : Google)

नुकतेच एका आईने आपल्या मुलासाठी केलेले एक टाइम टेबल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रेडइट या साइटवर व्हायरल झालेल्या या टाइम टेबलवर बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. हे आई आणि मुालामधील अॅग्रीमेंट आहे असे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणण्यात आले आहे. या आईने मुलाच्या उठण्यापासून ते त्याच्या आवरण्याच्या, खाण्याच्या, खेळण्याच्या, झोपण्याच्या अशा सगळ्या वेळा यामध्ये नक्की केल्या आहेत. ९ ते २ या वेळात काहीच न लिहील्याने या वेळात कदाचित त्या मुलाची शाळा असेल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे सकाळी उठल्यापासून कोणती गोष्ट किती वेळात करायची याचीही स्पष्टता आईने या टाइम टेबलमध्ये दिली आहे. 

मुलालाही कधी कोणती गोष्ट करायची आहे हे माहित असेल. सध्या वर्कींग वूमनला घर आणि ऑफीस सांभाळताना तारांबळ उडते. अशावेळी योग्य नियोजन केल्यास मुलांचे शेड्यूल बसण्यास सोयीचे जाते, पण म्हणून त्यासाठी अॅग्रीमेट करणे हे जरा अतीच होत असल्याचे म्हणत नेटीझन्सने या टाइम टेबलची खिल्ली उडवली आहे. या टाइम टेबलच्या सगळ्यात शेवटी रडारड न करता किंवा आरडाओरडी आणि बडबड न करता हे सगळे फॉलो केले तर दिवसाला १० रुपये आणि आठवडाभर असे वागल्यास १०० रुपये असेही यामध्ये लिहीलेले आहे. खाली या आईची सही असून तिचे आणि मुलाचे नाव किंवा गाव मात्र समजू शकलेले नाही. 

टॅग्स :सोशल व्हायरललहान मुलं