Lokmat Sakhi >Social Viral > पोळपाट लाटणे तुम्ही खरेच एकदम स्वच्छ करता का? पाहा योग्य पद्धत, नाहीतर होते इन्फेक्शन

पोळपाट लाटणे तुम्ही खरेच एकदम स्वच्छ करता का? पाहा योग्य पद्धत, नाहीतर होते इन्फेक्शन

Tip To Keep Your Chakla Belan Last Longer : पोळी लाटतात त्या पोळपाटावर आहेत असंख्य जीवाणू, या पद्धतीने स्वच्छ करा, नाहीतर होईल लवकर खराब..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 05:13 PM2023-12-05T17:13:14+5:302023-12-05T17:14:05+5:30

Tip To Keep Your Chakla Belan Last Longer : पोळी लाटतात त्या पोळपाटावर आहेत असंख्य जीवाणू, या पद्धतीने स्वच्छ करा, नाहीतर होईल लवकर खराब..

Tip To Keep Your Chakla Belan Last Longer | पोळपाट लाटणे तुम्ही खरेच एकदम स्वच्छ करता का? पाहा योग्य पद्धत, नाहीतर होते इन्फेक्शन

पोळपाट लाटणे तुम्ही खरेच एकदम स्वच्छ करता का? पाहा योग्य पद्धत, नाहीतर होते इन्फेक्शन

स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ असल्यास मन प्रसन्न राहते. शिवाय किचनमधली वस्तू स्वच्छ ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. किचनमध्ये अनेक प्रकारचे किडे फिरत असतात. पाली, झुरळं, मच्छर यासह इतर किडे भांडे व पदार्थाच्या भोवतीने घोळका घालतात. ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यासाठी स्वयंपाकघरातील लाटणं पोळपाट स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या घरात पोळपाट-लाटणे वापरण्यात येते; परंतु बहुतांश लोक त्याच्या साफसफाईकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.

पोळपाट (Cleaning Tips) लाटण्याचा वापर झाल्यानंतर त्यावर पीठ तसेच राहते. ज्यामुळे पोळपाट काळपट पडते, शिवाय त्यावर बुरशी तयार होते. मग त्यावर तयार होत असलेली पोळी आरोग्याच्या दृष्टीने योग्य की अयोग्य असा प्रश्न निर्माण होतो. कित्येक जणांना लाकडी पोळपाट लाटणं स्वच्छ करण्याची योग्य पद्धत माहित नसते. जर या पद्धतीने स्वच्छ केल्यास लवकर साफ होईल(Tip To Keep Your Chakla Belan Last Longer).

विकतचा कशाला? घरीच २ वाटी चणा डाळीचा करा गुजराथी स्पेशल खमण ढोकळा, ना इनोची गरज - ना अधिक मेहनत

या पद्धतीने करा लाकडी पोळपाट लाटणं साफ

लाकडी पोळपाट लाटण्यावर बॅक्टेरिया निर्माण होतात. जे सहसा लवकर निघत नाही. यासाठी कोमट पाण्यात डिश वॉशर लिक्विड घालून मिक्स करा. नंतर त्यात ५ मिनिटांसाठी लाकडी पोळपाट लाटणं भिजत ठेवा. नंतर स्पंचच्या स्क्रबरने लाकडी पोळपाट लाटणं घासून काढा. स्टील स्क्रबरचा वापर करणे टाळा. यामुळे पोळपाटावर स्क्रॅचेस पडू शकतात.

कोकणी पद्धतीची मऊसूत आंबोळी करायची आहे? साहित्य वाटताना त्यात मिसळा एक सिक्रेट गोष्ट, आंबोळ्या होतील परफेक्ट..

लाकडी पोळपाट लाटणं घासून झाल्यानंतर पूर्णपणे कोरडे करून घ्या. त्यानंतर त्यावर थोडे खोबरेल तेल किंवा कुकिंग ऑईल लावा. ३० मिनिटानंतर एका कापडाने पुसून काढा, शेल्फमध्ये किंवा उंच जागेवर ठेवा. जेणेकरून त्यावर कीटक फिरणार नाही.

पोळपाट लाटण्याला महिन्यातून एकदा सॅनिटाईझ करा

पोळपाट लाटण्याला एकदा सॅनिटाईझ करायला हवे. कारण लाकडी पोळपाटावर बॅक्टेरिया तयार होतात. जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. सॅनिटाईझ करण्यासाठी कोमट पाण्यात व्हिनेगर मिसळा. त्यात १० मिनिटासाठी पोळपाट लाटणं भिजत ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या, व कापडाने कोरडं करा.

Web Title: Tip To Keep Your Chakla Belan Last Longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.