Tips for cleaning cooler: उन्हाळ्यात गरमी दूर करण्यासाठी फॅन तर लोक वापरतातच. सोबतच कुलर आणि एसीही वापरतात. दरवर्षी लोकांना कुलर साफ करण्याची चिंता असते. वेळेवर मजुरही मिळत नाहीत. अशात आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कुलर साफ करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
हिवाळ्यात कुलरचा वापर बंद होतो. त्यानंतर अनेक महिन्यांपासून बांधून ठेवलेल्या कुलरवर धळू-माती जमा होतात किंवा जाळ्या लागतात. अशात पुन्हा कुलर सुरू करण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
वॉटर टॅंक क्लीन करा
सगळ्यात आधी प्लगचा स्विच बंद करा. कुलरमधील पाणी काढून टाका. त्यानंतर वॉटर टॅंक स्क्रब करा. नंतर त्यात व्हाईट व्हिनेगर टाका आणि 1 तासांनी पाण्याची टाकी साफ करा. यानं कुलरमधील वास आणि बॅक्टेरिया निघून जातील.
कुलिंग पॅडची सफाई
कुलिंग पॅड साफ करण्यासाठी व्हाइट व्हिनेगर आणि लिंबाचा वापर करा. अशात 1 टब पाणी घ्या. त्यात व्हाइट व्हिनेगर आणि लिंबाचा रस टाकून कुलिंग पॅड त्यात भिजवून ठेवा. त्यानंतर 10 मिनिटांनी कुलिंग पॅड वाळत घाला. नंतर कुलरमध्ये लावा.
कुलरचे पाते कसे साफ कराल?
कुलरचे पाते साफ करण्यासाठी माइल्ड डिटर्जेंटचा वापर करू शकता. यासाठी माइल्ड डिटर्जेंट मिक्स करून पाते साफ करा. पण हे साफ करताना काळजी घ्या. कारण पात्याचे कोपरे धारदार असतात. अशावेळी हात कापण्याची भीती असत. पाते साफ करून झाल्यावर त्यावर सॅनिटायझर मारा. यानं बॅक्टेरिया नष्ट होतात.
बॉडी क्लीन करा
व्हाइट व्हिनेगरचा वापर करून कुलरची बॉडी चमकदार बनवू शकता. यासाठी पाण्यात व्हाइट व्हिनेगर टाका. या पाण्यानं कुलरची बॉडी साफ करा. बॉडीचा वास घालवण्यासाठी नंतर उन्हाळ वाळवा.
मोटरमध्ये तेल टाका
कुलर क्लीन करण्यासाठी मोटर साफ करून त्यात थोडं तेल टाका. कुलरचे पाते आणि मोटरमध्ये ल्यूब्रिकंट ऑइल टाका. ज्यामुळे कुलरचा जास्त आवाज येणार नाही.