उन्हाळा आला की टेबल फॅनची जास्त गरज भासते. मात्र टेबल फॅन साफ करणं थोडं त्रासदायक वाटू शकतं. पण जर योग्य पद्धत अवलंबली तर हे काम सोपं आणि लवकर होतं. जास्त प्रयत्न न करता तुम्ही तुमचा टेबल फॅन नव्यासारखा चमकू शकता. कसं ते जाणून घेऊया...
टेबल फॅन असा करा स्वच्छ
पंखा बंद करा आणि प्लग काढा
सुरक्षितता सर्वात आधी लक्षात ठेवा. पंखा बंद करा आणि तो वीजेपासून डिस्कनेक्ट करा. जेणेकरून कोणताही धोका होणार नाही.
फॅनचं ग्रिल उघडा
पंख्याच्या मागे किंवा बाजूला क्लिप किंवा स्क्रू जोडलेले असतात.स्क्रूड्रायव्हरने ते लूझ करा आणि हळू ग्रिल काढा.
पंख्याचे ब्लेड काढा
सहसा ब्लेड फिरवून किंवा स्क्रू उघडल्यावर बाहेर येतात.ते काढताना, लक्षात ठेवा की काही पंख्यांमध्ये ब्लेड विरुद्ध दिशेने उघडतात.
क्लिनिंग मिक्स बनवा
एका भांड्यात कोमट पाण्यात थोडासा लिक्विड डिश सोप आणि १ चमचा बेकिंग सोडा मिसळा.हे मिश्रण ब्लेडवर लावा आणि स्पंज किंवा मऊ कापडाच्या मदतीने साफ करा.
ब्रश किंवा टूथब्रश वापरा
जाळी आणि ब्लेडच्या कडांवरील घाण काढण्यासाठी जुना टूथब्रश खूप उपयुक्त आहे.
स्वच्छ पाण्याने धुवा आणि सुकू द्या
पाण्याने चांगलं धुवा आणि सुती कापडाने घ्या.
सर्व भाग पुन्हा एकत्र करा
सर्वकाही कोरडे झाल्यावर, पंखा काळजीपूर्वक पुन्हा जोडा. जास्त खराब होऊ नये आणि घाण साचू नये म्हणून दर २-३ आठवड्यांनी पंखा पूसून घ्या. इलेक्ट्रॉनिक भाग कधीही ओल्या कापडाने पुसू नका.