Join us  

घरातल्या बल्ब-ट्युबलाईटवर काळ्याकुट्ट धुळीचे थर साचले? १ ट्रिक, लख्ख चमकतील बल्ब- घर उजळून निघेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 3:25 PM

Tips And Tricks How To Clean Sticky Dust From Tube Lights : चिकट बल्ब आणि ट्यूबलाईट सहज साफ करता येतात.

सणासुधीच्या काळात प्रत्येकजण आपापल्या घराची साफसफाई करतो.  कपाटापासून, अंथरूणापासून सर्व काही स्वच्छ केलं जातं. पण काही ठिकाणी असे असतात जिथे आपलं लक्ष जात नाही आणि सहज हातही पुरत नाही त्यामुळे अशी ठिकाण साफ करायची राहून जातात. (Cleaning Tips) महिनोंमहिने धूळ, घाण साचल्यामुळे वस्तू जुनाट दिसू लागतात.  घाणेरड्या ट्यूबलाईट  वेळीच स्वच्छ करणं गरजेचं असतं. चिकट बल्ब आणि ट्यूबलाईट सहज साफ करता येतात. (Tips And Tricks How To Clean Sticky Dust From Tube Lights And Bulbs Safelt At Home)

बल्ब साफ करण्याची पहिली पद्धत

सगळ्यात आधी एका वाटीत २ चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यात एक लिंबू कापून याचा रस घाला. लिंबू पिळून हे तुकडे बेकींग सोड्यावर ठेवा त्यानंतर सावधगिरीनं बल्बचा चिकटपणा दूर करा.  हा उपाय केल्यानं  बल्ब चमकदार दिसेल तसंच मायक्रोफायबर किंवा कॉटनच्या कापडानं पुसून  हवेत सुकण्यासाठी ठेवा.

दुसरी पद्धत

एक मग अर्धा भरून पाणी घ्या त्यात ४ चमचे बेकिंग सोडा घाला. याचे मिश्रण तयार करा. जेव्हा बल्ब किंवा ट्यूबलाईट पूर्णपणे थंड होईल तेव्हा मायक्रोफायबर कपडे यात  बुडवा आणि सावधगिरी पुसून घ्या. ज्यामुळे घाण साफ होण्यास मदत होईल.

तिसरी पद्धत

एक मग पाण्यत अर्धा कप व्हिनेगर घाला. या मिश्रणात  १ चमचा डिटर्जेंट मिसळू शकता.  जेव्हा मायक्रोफायबर कपडे यात बुडवून  बल्ब किंवा ट्यूबलाईटनं पुसून घ्या. गरम बल्ब किंवा ट्यूबलाईटवर ओलं कापड ठेवण्याचा प्रयत्न करू नका किंवा अधिक जोर लावून घासू नका. साफसफाई करण्याआधी व्यवस्थित सुकू द्या. नंतर स्विच कनेक्ट करा. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया