Lokmat Sakhi >Social Viral > घरात चिलटं, माश्या खूप येतात ? ५ सोपे उपाय, घरातही एकही किटक दिसणार नाही

घरात चिलटं, माश्या खूप येतात ? ५ सोपे उपाय, घरातही एकही किटक दिसणार नाही

How to deal with flies problem with homemade spray हे लहान लहान किटक अन्नाच्या संपर्कात आल्यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात. घर शक्य तितकं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 05:07 PM2023-09-26T17:07:00+5:302023-09-27T09:46:01+5:30

How to deal with flies problem with homemade spray हे लहान लहान किटक अन्नाच्या संपर्कात आल्यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात. घर शक्य तितकं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.

Tips and tricks how to deal with flies problem with homemade spray ant natural home remedies | घरात चिलटं, माश्या खूप येतात ? ५ सोपे उपाय, घरातही एकही किटक दिसणार नाही

घरात चिलटं, माश्या खूप येतात ? ५ सोपे उपाय, घरातही एकही किटक दिसणार नाही

पावसाळ्याच्या दिवसात घरात माश्या आणि चिलटं  भरपूर येतात. माश्या आणि चिलटांना दूर घालवण्यासाठी कितीही उपाय केले तरी ते पुन्हा अन्नावर येऊन बसतात. (Home Hacks) हे लहान लहान किटक अन्नाच्या संपर्कात आल्यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात. घर शक्य तितकं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्नपदार्थ उघड्यावर ठेवू नका. उघड्यावर ठेवलेली फळं, खरकटं यावर सगळ्यात जास्त चिलटं आणि माश्या बसतात.  (How to deal with flies problem with homemade spray) चिलटं, माश्यांना दूर घालवण्याचे सोपे उपाय पाहूया.

1) एक कप पाण्यात एक चमचा बेकींग सोडा मिसळा त्यात २ लिंबून पिळून घाला. आता हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घरातील सर्व कोपऱ्यांवर स्प्रे करा. यामुळे घरातील माश्या, किडे दूर पळतील आणि पुन्हा येणार नाहीत. 

2) काळी मिरीचा स्प्रे वापरून तुम्ही माश्या आणि किडे घरात येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. यासाठी सगळ्यात आधी काळी मिरी बारीक कुटून त्याची पावडर बनवा. त्यात एक पाणी दोन चमचे काळी मिरी पावडर मिसळा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून घरात शिंपडा. यामुळे माश्या आणि किटक दूर होण्यास मदत होईल. 

नियमित खा ५ पदार्थ, स्मरणशक्ती वाढेल-मंद डोकं चालायला लागेल सुसाट

3) एसेंशियल ऑईलच्या सुगंधाने माश्या किडे दूर होण्यास मदत होईल. लादी पुसण्याच्या पाण्यात इसेंशियल ऑईलचे काही थेंब मिसळा. इसेंशियल ऑईल घालून तुम्ही किटक, माश्यांना घरापासून दूर पळवू शकता. यामुळे घरही सुगंधित होईल. 

4) कडुलिंबाच्या सुगंधाने माश्या आणि किडे दूर राहण्यास  मदत होईल. रात्र होताच बल्बजवळ किटक उडू लागतात. बल्ब लावण्याच्या ठिकाणी तुम्ही कडुलिंबाची फांदी किंवा पानं ठेवू शकता. यामुळे माश्या आणि चिलटं लाईट्सच्या आजूबाजूला येणार नाहीत. कडुलिंबाची पानं वाटून पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण बनवून घरात स्प्रे करा. 

रोज नाश्त्याला काय खाता? माधुरीचे पती डॉ. नेने सांगतात नाश्ता करण्याच्या ५ टिप्स- निरोगी राहाल

5) तुळशीच्या पानांत अनेक औषधी घटक असतात. त्यामुळे अनेक आजारांपासूनही दूर राहता येते. तुम्ही घराच्या जवळपास किंवा गॅलरीत तुळशीचे झाड लावू शकता. ज्यामुळे किटक दूर होतील आणि घराचे वातावरण शुद्ध राहील. 

Web Title: Tips and tricks how to deal with flies problem with homemade spray ant natural home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.