कारले त्याच्या चवीमुळे ओळखले जाते. परंतु, ही भाजी अनेकांना खायला आवडत नाही. (How to Get Rid of the Bitterness in Karela) कारल्याचे नाव ऐकताच लहानांसह मोठी माणसं देखील नाक मुरडतात. कारली हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी आहे.(Simple Tricks to Reduce Karela’s Bitterness for a Better Taste) मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर लागते. (Effective Ways to Remove the Bitter Taste from Karela)
कारल्यामध्ये ग्लायकोसाइड मोमोर्टिसन नावाचा नैसर्गिक घटक असतो जो आपल्या पचनशक्तीसाठी चांगला मानला जातो.(Kitchen Hacks to Make Karela Less Bitter and More Delicious) कारल्यामध्ये फायबर, लोह, जीवनसत्त्व आणि खनिजे आढळतात.(How to Cook Karela Without the Bitterness) परंतु, त्याच्या कडूपणामुळे ही भाजी अनेकांना खावीशी वाटत नाही. कारल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते रोगप्रतिकारशक्ती वाढवतात तसेच संसर्गापासून आपले संरक्षण करतात. परंतु, आपण काही सोप्या टिप्स वापरल्या तर भाजीचा कडूपणा जाण्यास नक्की मदत होईल.
पाटा वरवंटा वापरण्याआधी ४ सोप्या टिप्स, वाटणाला येईल चव-लगेच दळेल...
कारल्याचा कडूपणा कसा घालवाल?
1. कारल्याला आतून आणि बाहेरुन स्वच्छ करुन त्याचे लहान तुकडे करा, त्यावर मीठ घाला. चांगले चोळून घ्या. त्यातून पाणी बाहेर पडेल. यानंतर कारले पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे कारल्याचा कडूपणा बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
2. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी नारळाच्या पाण्यात काही वेळ ठेवा. नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, यामुळे कारल्याचा कडूपणा बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
3. कारले कापून घ्या. ते दह्यात घालून कमीत कमी ३० मिनिटे ठेवा. पाण्याने स्वच्छ करा. यानंतर आपण कारल्याची हवी ती रेसिपी बनवू शकतो.
भाज्या खरेदी करताना या १० गोष्टी लक्षात ठेवा, किडक्या-खराब नको, आठवडाभर राहातील फ्रेश आणि ताज्या...
4. जर आापल्याकडे दही नसेल तर पांढरा व्हिनेगर देखील आपण वापरु शकतो. कारले कापून एका भांड्यात ठेवा. त्यात पांढरा व्हिनेगर घाला, मिक्स करा आणि ३० मिनिटे झाकून ठेवा. कारल्यात अर्धा कप व्हिनेगर, एक कप पाणी आणि दोन चमचे साखर घालून मिक्स करा. अर्धा तास तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा. त्यामुळे कारल्याची चव कडू लागणार नाही.
5. कारल्याची भाजी किंवा भजी बनवत असाल तर त्यात लिंबाचा रस, टोमॅटो, सुक्या आंब्याची पावडर घाला. यामुळे आंबटपणा येईल आणि कारल्याचा कडूपणा निघून जाईल.
6. कारले कापताना आपण त्याचे वरचे सालही सोलू शकतो. यामुळे कारल्याचा कडूपणा बराच कमी होईल. कारले कापल्यानंतर लिंबाचा रस देखील घालू शकता.