Lokmat Sakhi >Social Viral > किचनमध्ये मुंग्याचा सुळसुळाट? २ उपाय -मुंग्या पटकन गायब होतील आणि सततचा त्रासही होईल कमी

किचनमध्ये मुंग्याचा सुळसुळाट? २ उपाय -मुंग्या पटकन गायब होतील आणि सततचा त्रासही होईल कमी

How To Get Rid Of Ants In The Kitchen : केमिकल्सयुक्त रसायनं शिंपडल्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करावी लागणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:54 IST2024-12-05T23:50:01+5:302024-12-06T16:54:44+5:30

How To Get Rid Of Ants In The Kitchen : केमिकल्सयुक्त रसायनं शिंपडल्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करावी लागणार नाही.

Tips And Tricks How To Get Rid Of Ants In The Kitchen Permanently | किचनमध्ये मुंग्याचा सुळसुळाट? २ उपाय -मुंग्या पटकन गायब होतील आणि सततचा त्रासही होईल कमी

किचनमध्ये मुंग्याचा सुळसुळाट? २ उपाय -मुंग्या पटकन गायब होतील आणि सततचा त्रासही होईल कमी

स्वयंपाकघरात किडे, उंदीर, झुरळं दिसणं खूपच सामान्य आहे. स्वंयपाकघरात घाण पसरल्यामुळे मुंग्या येतात. स्वंयपाक घर कितीही स्वच्छ ठेवल्यानंतर मुंग्या येत असतील तर तुम्ही मुंग्यांना पळवण्यासाठी काही सोपे उपाय ट्राय करू शकता. काही घरगुती उपाय करून तुम्ही मुंग्यांना पळवून लावू शकता. केमिकल्सयुक्त रसायनं शिंपडल्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करावी लागणार नाही. पंकज भदौरिया यांनी इंस्टाग्रामवर काही उपाय शेअर केले आहेत. (Tips And Tricks How To Get Rid Of Ants In The Kitchen Permanently)

स्वंयपाक घरात मुंग्यांना पळवण्यासाठी तुम्ही कोणताही कठोर  केमिकल्सचा वापर करू शकता. स्वंयपाक घरातील अनेक खाण्याच्या पदार्थांच्या संपर्कात हे केमिकल्स येऊ शकतात. मुलं लहान असतील तर मुंग्याचे हानीकारक केमिकल्स त्यांना नुकसान पोहोचवू शकतात.

मुंग्यांना पळवण्यासाठी घरीच बनवा सोल्यूशन

सगळ्यात आधी एक स्प्रे बॉटल घ्या. यासाठी तुम्ही कोणतीही जुनी बॉटल घेऊ शकता. नंतर या बॉटलमध्ये पाणी, डेटॉल आणि एक छोटा चमचा हिंग मिसळा. हे सोल्यूशन व्यवस्थित मिसळल्यासस मुंग्या दिसणार नाहीत. हिंग आणि डेटॉलचा वास मुंग्यांना येण्यापासून रोखेल.

उपाय क्रमांक २

एक कापूरची वडी घ्या आणि एका पेपरमध्ये ठेवून बारीक कुटून घ्या.  नंतर एका भांड्यात गरम पाणी करा. त्यात कापूराची वडी  चुरून घाला. या पाण्यात एक चमचा डेटॉल लिक्विड घाला. तिसरी वस्तू म्हणजे बोरीक पावडर. एक चमचा बोरीक पावडर आणि एक चमचा व्हिनेगर पाण्यात घाला. तयार मिश्रणानं मुंग्या कायमच्या पळून जातील. हे सोल्यूशन तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून शिंपडू शकतात. हे सोल्यूशन रोपांवरही घालू शकता. 
 

Web Title: Tips And Tricks How To Get Rid Of Ants In The Kitchen Permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.