Lokmat Sakhi >Social Viral > घरातल्या लाईट्सभोवती किडे-चिलटं धुमाकूळ घालतात? ४ ट्रिक्स, दारं-खिडक्या बंद करण्याची गरज नाही

घरातल्या लाईट्सभोवती किडे-चिलटं धुमाकूळ घालतात? ४ ट्रिक्स, दारं-खिडक्या बंद करण्याची गरज नाही

Tips And Tricks How To Get Rid Of Insects : घरात किडे येऊ नयेत यासाठी तुम्ही लवंगाच्या तेलाचा वापर करू शकताय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 10:39 AM2024-10-10T10:39:19+5:302024-10-10T15:21:06+5:30

Tips And Tricks How To Get Rid Of Insects : घरात किडे येऊ नयेत यासाठी तुम्ही लवंगाच्या तेलाचा वापर करू शकताय

Tips And Tricks How To Get Rid Of Insects Coming In House At Night Time Follow These Tips | घरातल्या लाईट्सभोवती किडे-चिलटं धुमाकूळ घालतात? ४ ट्रिक्स, दारं-खिडक्या बंद करण्याची गरज नाही

घरातल्या लाईट्सभोवती किडे-चिलटं धुमाकूळ घालतात? ४ ट्रिक्स, दारं-खिडक्या बंद करण्याची गरज नाही

अनेक घरांमध्ये रात्री लाईट्स सुरू असल्यामुळे भरपूर किडे येतात. ज्यामुळे बरेच लोक त्रस्त असतात. जर तुमच्या घरातही रात्रीच्यावेळेस छोटे किडे येत असतील तर तुम्हाला टेंशन घेण्याचं काही कारण नाही. कारण  काही घरगुती उपाय करून तुम्ही या किड्यांपासून सुटका मिळवू शकता. (Home Hacks) हे घरगुती उपाय कोणते ते पाहूया. (How To Get Rid Of Insects At Home)

लवंग

घरात किडे येऊ नयेत यासाठी तुम्ही लवंगाच्या तेलाचा वापर करू शकता. लवंगाच्या तेलाला एका स्प्रे बॉटलमध्ये भरून पाण्यासोबत मिसळा. नंतर खिडक्या आणि दरवाज्यांजवळ स्प्रे करा.  याच्या तीव्र वासानं किटक दूर होण्या मदत होते. (Tips And Tricks How To Get Rid Of Insects Coming In House At Night Time Follow These Tips)

कडुलिंबाच्या तेलाचा वापर

याव्यतिरिक्त तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचा वापरही करू शकता. कडुलिंबाच्या तेलानं किडे दूर  पळवण्यास मदत होते. तुम्हाला कडुलिंबाच्या तेलाला पाण्यासोबत मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरून दरवाजे आणि लाईट्सच्या जवळस स्प्रे करावं लागेल. ज्यामुळे किडे कमी  येतील. 

तुळशीचं पानं

तुळशीचं पानं किड्यांना दूर ठेवण्यास मदत करते. तुम्ही घराच्या आजूबाजूला हे रोप लावू शकता. जर घरात किडे भरपूर येत असतील तर तुम्ही किडे मारण्याच्या औषधाचा वापर करू शकता. पण याचा वापर करण्यापूर्वी त्यावरील गाईडलाईन्स वाचायला  विसरू नका. 

पिवळ्या लाईट्सचा वापर

याव्यतिरिक्त तुम्ही पिवळ्या लाईट्सचा वापर करू शकता. कारण पिवळे किडे  प्रकाशाकडे आकर्षित होतात. तुम्ही रात्री पांढऱ्या लाईट्सऐवजी  पिवल्या बल्बचा वापर करू शकता. इतकंच नाही तर तुम्ही खिडक्या आणि  दरवाज्यांवर मच्छरदानी लावू शकता. यामुळे किडे घरात येणार नाहीत.

Web Title: Tips And Tricks How To Get Rid Of Insects Coming In House At Night Time Follow These Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.