पावसाळ्यात घरात किटक आणि पाली जास्तच दिसतात. बाहेर पाऊस पडत असल्यानं गरम जागेच्या आणि निवाऱ्याच्या शोधात असलेल्या पाली घरात शिरतात. रात्री लाईट लावल्यानंतर लाईट्सभोवती किडे येतात. पालीसुद्धा त्याच ठिकाणी दिसून येतात. किटक चावल्यामुळे पुरळ, इन्फेक्शनचा त्रासही होतो. घरातील वातावरण चांगलं आणि स्वच्छ-निरोगी ठेवण्यासाठी झुरळं, पालींना घराबाहेर काढणं गरजेचं आहे. (Tips and tricks how to get rif of lizards and cockroach) पाली आणि झुरळांना पळवून लावण्यासाठी केमिकल्सयुक्त स्प्रे चा वापर करण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय करून पाहायला हवेत.
काळी मिरीच्या स्प्रेचा वापर करा
पाली बनवण्यासाठी काळी मिरीची स्प्रे तयार करू शकता. हा स्प्रे तयार करण्यासाठी सगळ्यात आधी काळी मिरी दळून त्याची पावडर बनवा. आता ही पावडर पाण्यात व्यवस्थित मिसळा त्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरा. ज्या ठिकाणी पाली खूप जास्त आहेत असं तुम्हाला वाटतं तिथे या स्प्रे ची फवारणी करा. काळ्या मिरीऐवजी तुम्ही पाण्यात लाल तिखट मिसळूनही मिश्रण बनवू शकता. त्याची फवारणी केल्यानेही पाली घरापासून लांब राहतील.
कांदा- लसूण घ्या
लसूण आणि कांद्याचा वास तीव्र असतो. ज्यामुळे पाली दूर पळवण्यास मदत होते. हे दोन्ही पदार्थ पालींना कोणतंही नुकसान पोहोचवत नाहीत. पालींना दूर पळवण्यासाठी घरात कांद्याचे किंवा लसणाचे तुकडे ठेवा. प्लास्टीकच्या एका बॉटलमध्ये पाणी घालून त्यात कांदा लसणाचा रस मिसळा आणि घरातील कोपरे, भितींवर स्प्रे मारा यामुळे पाली लांब राहतील.
नेफ्थलीन गोळ्या
नेफ्थलीन गोळ्या घरात ठेवल्यास पालींपासून सुटका मिळवणं अधिक सोपं होऊ शकतं. याचा वापर फक्त घरात करायला हवा. लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांपासून या गोळ्या लांब ठेवाव्यात. नेफ्थलीनच्या गोळ्यांच्या संपर्कात आल्यानं पाळीव जनावरं आणि माणसांच्याही आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. पालींना या गोळ्यांचा सुगंध अजिबात सहन होत नाही. या गोळ्या स्वयंपाकघर किंवा सिंकच्या खाली ठेवल्या जाऊ शकतात. खाण्यापिण्याच्या सामानाजवळ या गोळ्या ठेवू नयेत. याशिवाय तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा रस पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे घरातील किटकांना दूर पळवण्यासाठी वापरू शकता.