रोज कपडे धुणं, धुतलेल्या कपड्यांना इस्त्री करणं खूपच बोरींग काम वाटतं. जर तुम्ही ऑफिसच्या किंवा घरातल्या इतर कामांमध्ये व्यस्त राहत असाल तर कपडे धुण्यासाठी काही जुगाड करून तुम्ही सोप्या पद्धतीनं कपडे धुवू शकता कपडे इतके व्यवस्थित धुवून होतील की तुम्हाला वारंवार इस्त्री करण्याची गरजच लागणार नाही. मुलांचा युनिफॉर्म असो किंवा ऑफिसचे कपडे हे कपडे इस्त्री न फिरवता घातले तर खराब ते खूपच दिसते व्यक्ती प्रेझेंटेबल दिसत नाही. कपड्यांना रिंकल्स फ्री ठेवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Tips And Tricks How To Prevent Wrinkles In Clothes During Washing Follow Small Hacks Must Try With Ice Cubes)
जेव्हा कपडे व्यवस्थित धुवून होतील तेव्हा मशिनच्या ड्रमचे अर्धे कपडे मशिनमधून काढून घ्या आणि त्यावर ५ ते ६ आईस क्यूब फिरवा नंतर आईस क्यूब पुन्हा घालून ड्रायर ऑन करा. जेव्हा तुम्ही ड्रायरमध्ये आईस क्यूब घालता तेव्हा हिटमुळे स्टिम बनू लागते आणि स्टिममुळे रिंकल्स कमी होतात.
साबुदाणा खिचडीचा गोळा होतो-चिकट होते? १ ट्रिक -खिचडी होईल मऊ मोकळी
कपड्यांवर सुरकुत्या दिसत असतील तर एक स्प्रे बॉटल घेऊन त्यात अर्ध पाणी आणि अर्ध व्हाईट व्हिनेगर मिसळा. सुकवण्याआधी रिंकल्स असलेल्या ठिकाणी स्प्रे करा. कपडे सुकल्यानंतर रिंकल्स दिसणार नाहीत. जर तुम्ही कपडे रॅकवर सुकवले तर त्याचे डाग पडू शकतात. कपड्यांवर रिंकल्स येण्याची शक्यता असते. म्हणूनच हँगरला लावून कपडे सुकवा. या पद्धतीने डाग टाळता येतात.
सुकल्यानंतर कपडे व्यवस्थित फोल्ड करा किंवा कोणत्याही जड वस्तूखाली दाबा. या गोष्टीची काळजी घ्या की कपडे तुम्ही व्यवस्थित फोल्ड केले आहेत. डबल फोल्डचे वळ उमटणार नाहीत याची काळजी घ्या. या पद्धतीनं तुम्ही शर्ट, ड्रेसवरच्या सुरकुत्या काढू शकता.