Join us  

न घासता, हात न लावता टॉयलेट स्वच्छ करण्याच्या ४ टिप्स; २ मिनिटांत पांढरंशुभ्र-स्वच्छ दिसेल बाथरूम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 8:10 PM

How to Clean Toilet Seat Without Using Hands : बोरेक्स पावडर आणि लिंबाचा रस घालून तुम्ही टॉयलेट स्वच्छ करू शकता. यासाठी ३ ते ४ चमचे बोरेक्स पावडरमध्ये अर्धा कप लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा.

टॉयलेट घरातील अशी एक जागा असते जिथे बॅक्टेरियाज आणि व्हायरसची संख्या वाढते. त्यासाठी नियमित स्वरूपात साफ-सफाई करणं गरजेचं असतं. (Home Hacks) अनेकदा बॅक्टेरियल इन्फेक्शनचं कारण ठरतं.  टॉयलेट सीट साफ करणं स्वच्छता आणि आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. (Home Tips) ज्यामुळे गंभीर स्थिती उद्भवू शकते. ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो.  अनेकदा टॉयलेट सीट हात लावून घासण्याची अनेकांना किळस वाटते. हे उपाय करून तुम्ही हात न लावता टॉयलेट स्वच्छ करू शकता. (How to Clean Toilet Without Using Hands) 

१) सोड्याचा वापर करा (Baking Soda For Toilet Cleaning)

सोड्याच्या मदतीने टॉयलेट सीट स्वच्छ करणं खूपच सोपं आहे. सोडा एक क्लिनिंग एजेंटप्रमाणे काम करते ज्यामुळे चांगले परिणाम दिसत नाहीत. ३ ते ४ चमचे सोडा अर्धा कप पाण्यात मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट डाग असलेल्या ठिकाणी लावून अर्ध्या तासासाठी तसंच ठेवून द्या. नंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे टॉयलेट सीटचे सर्व डाग निघून जातील.

२) ग्लिसरीन आणि व्हिनेगर (Glycerine And Vinegar)

टॉयलेट साफ करण्यासाठी ग्लिसरीनसुद्धा वापरू शकता. यासाठी एक बॉटल कोल्ड ड्रिंक घ्या आणि त्यात १ कप ग्लिसरीन आणि व्हाईट व्हिनेगर मिक्स करा. त्यानंतर यात थोडा लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल घालून मिक्स करा.  हे मिश्रण कोणत्याही स्प्रे बॉटलमध्ये भरून टॉयलेट क्लिनरप्रमाणे वापरा.  या उपायाने टॉयलेट सीट क्लिन होण्यास मदत होईल आणि बॅक्टेरिया फ्री होईल.

पोट कमी करायचंय, पण जीम नको? रोज सकाळी 'या' वेळेत वॉक करा, झरझर कमी होईल वजन

३) क्लिनिंग टॅब्लेट (Cleaning Tablet)

टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी तुम्ही क्लिनिंग टॅब्लेट्सचा वापर करू शकता. हा एक सोपा उपाय आहे. क्लिनिंग टॅब्लेट हा उत्तम उपाय आहे. बॅक्टेरिया, व्हायरस आणि अन्य किटाणू दूर करण्यासाठी उत्तम उपाय आहे. या टॅब्लेटच्या पाकीटावर लिहिलेले  टॉयलेट टँकमध्ये घालून ठेवा. यासाठी ब्रशचा वापर करण्याची गरज नाही.

प्रोटीनसाठी महागड्या गोेष्टी परवडत नाहीत? फक्त १० रुपयांत खा ३ प्रोटीन पदार्थ- हाडं होतील बळकट

४) बोरेक्स आणि लिंबाचा रस (Borax Powder And Lemon Juice)

बोरेक्स पावडर आणि लिंबाचा रस घालून तुम्ही टॉयलेट स्वच्छ करू शकता. यासाठी ३ ते ४ चमचे बोरेक्स पावडरमध्ये अर्धा कप लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण शीटवर घालून एक तासासाठी तसंच ठेवा. त्यानंतरर कपडे किंवा नॅपकीनने सीट साफ कव्हर करा. या उपायामुळे टॉयलेट सीट नव्यासारखी चमकदार  दिसते. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया