Lokmat Sakhi >Social Viral > कुकर आतून जळाला-काळेपणा निघतच नाही? 'ही' खास ट्रिक पाहा, चकचकीत होईल कुकर

कुकर आतून जळाला-काळेपणा निघतच नाही? 'ही' खास ट्रिक पाहा, चकचकीत होईल कुकर

Tips And Tricks If The Burnt Black Cooker In The Kitchen : कुकर खालून जळाला असेल तर पुन्हा स्वच्छ व्हावा यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शता ज्यामुळे कुकर एकदम नव्यासारखा चमकेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 07:27 PM2024-08-20T19:27:56+5:302024-08-20T19:46:00+5:30

Tips And Tricks If The Burnt Black Cooker In The Kitchen : कुकर खालून जळाला असेल तर पुन्हा स्वच्छ व्हावा यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शता ज्यामुळे कुकर एकदम नव्यासारखा चमकेल.

Tips And Tricks If The Burnt Black Cooker In The Kitchen Irritates You Then Special Tips To Make It Shine | कुकर आतून जळाला-काळेपणा निघतच नाही? 'ही' खास ट्रिक पाहा, चकचकीत होईल कुकर

कुकर आतून जळाला-काळेपणा निघतच नाही? 'ही' खास ट्रिक पाहा, चकचकीत होईल कुकर

घरात स्वंयपाक करताना नेहमी वापरली जाणारी भांडी कायम खराब होत असतात. कुकर आणि कढई कितीही स्वच्छ केली तरी नव्यासारखी होत नाही. (Cooking Hacks)  कुकर प्रत्येक ठिकाणी वापरला जातो.  अनेकदा कुकरवर काही ठेवलं असेल गॅस उच्च आचेवर ठेवला किंवा आपलं लक्ष जरा बाजूला झालं की कुकर लगेच खालून जळायला सुरूवात होते.  कुकर खालून जळाला असेल तर पुन्हा स्वच्छ व्हावा यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शता ज्यामुळे कुकर एकदम नव्यासारखा चमकेल. (How To Clean Burnt Cooker)

1)  सैंधव मीठ

जर प्रेशर कुकर आतून पूर्णपणे जळून काळा झाला असेल तर  टेंशन घेण्यासारखं काही नाही. कुकरमध्ये २ ते ३ ग्लास पाणी घालून ठेवा. त्यानंतर पाण्यात २ ते ३ चमचे सैंधव मीठ घाला पाणी उकळण्यासाठी ठेवा. थोडया वेळानंतर गॅस बंद करून कुकरमधलं सगळं पाणी फेकून द्या. नंतर स्क्रबच्या मदतीने कुकर व्यवस्थित रगडून स्वच्छ करा. ज्यामुळे कुकर नव्यासारखा दिसू लागेल. 

केस गळणं वाढलंय? रामदेव बाबा सांगतात केस वाढवण्याचा खास उपाय, केस होतील दाट

2) व्हिनेगर आणि लिंबाचा रस

काळा आणि  काळेरडा कुकर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि लिंबाचा रस वापरू शकता. कॉम्बिनेशन कामात येतं.  काळा कुकर साफ करू शकता. यासाठी कुकरमध्ये २ ते ३ चमचे व्हिनेगर घाला. नंतर २ ते ३ लिंबू कापून घ्या. त्यानंतर २ ते ३ चमचे रस काढून व्हिनेगरमध्ये मिसळा. नंततर कुकर थोडा गरम करून २० मिनिटं तसंच ठेवा. नंतर कुकर रगडून स्वच्छ करा. ज्यामुळे कुकरचा चांगली चमक येईल.

ओपन पोर्समुळे चेहरा खराब-डल झाला? डॉक्टर सांगतात खास उपाय, ओपन पोर्स १ दिवसात गायब

3) व्हिनेगर आणि कांद्याचा रस

कुकर काळा, घाणेरडा झाला असेल कांदा आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. हा उपाय करण्यासाठी ४ ते ५ चमचे कांद्याचा रस घ्या. हे मिश्रण कुकरमध्ये घालून स्क्रबने व्यवस्थित रगडून  घ्या. थोड्याच वेळात कुकरचे डाग निघून  जातील.

4) डिश वॉश लिंबाने स्वच्छता करा

जर घरात व्हिनेगर किंवा सैंधव मीठ नसेल तर तुम्ही लिंबू किंवा डिश वॉशचा वापर करू शकता. ज्यामुळे काळा, घाणेरडा प्रेशर कुकर साफ होईल. सगळ्यात आधी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घाला. त्यात अर्धा लिंबू पिळून घाला नंतर एक चमचा डिश वॉश घालून गॅसवर ५ मिनिटांसाठी ठेवा. पाणी गरम करून स्क्रबरने कुकर रगडून स्वच्छ  करा. कुकर साफ झाला की एकदम नव्यासारखा दिसेल.

Web Title: Tips And Tricks If The Burnt Black Cooker In The Kitchen Irritates You Then Special Tips To Make It Shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.