Join us  

शॉक लागण्याच्या भीतीने स्विच बोर्ड साफच करत नाही? ६ टिप्स, कळकट स्विच बोर्ड दिसेल नव्यासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 12:41 PM

Tips and Tricks To Clean Switch Boards घर साफ पण स्विच बोर्ड कळकट? ६ टिप्स, चकाचक दिसेल बोर्ड..

घराच्या स्वच्छतेकडे प्रत्येकजण बारकाईने लक्ष देतो. स्वच्छतेमुळे घरात प्रसन्न वातावरण राहतं. घरातील प्रत्येक कोपरा आपण स्वच्छ करतो. पण काही वेळेला काही गोष्टी राहून जातात. ज्यात स्विच बोर्डचा समावेश आहे. बरेच लोकं स्विच बोर्ड साफ करण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे घरातील विजेचे स्विच आणि बोर्ड इतके काळे पडतात, की त्यावर चिकट थर साचू लागतो.

काळे झालेले स्विच बोर्ड साफ करण्यापूर्वी, काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे आपल्याला हानी पोहचू शकते. त्यामुळे काही टिप्स फॉलो करून सावधानीने स्वीच बोर्ड साफ करा(Tips and Tricks To Clean Switch Boards).

स्विच बोर्ड साफ करण्यासाठी काही टिप्स

सर्वात आधी पावर कट करा

स्विच बोर्ड साफ करताना विजेचा झटका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कधीही स्विच बोर्ड साफ करताना विजेचं कनेक्शन बंद करूनच साफ करा. यासह स्विच बोर्ड साफ करत असताना हातात मोजे व पायात स्लीपर घाला.

नव्या झाडूमधून फार भुसा पडतो, घरभर पसरतो? २ टिप्स, नवा झाडू घेतला की नक्की वापरा..

व्हिनेगर

स्विच बोर्डवरील डाग घालवण्यासाठी आपण व्हिनेगरची मदत घेऊ शकता. यासाठी एक कप पाण्यात दोन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. नंतर या मिश्रणात एक सुती कापड बुडवून चांगले पिळून घ्या. त्यानंतर या मिश्रणाने स्विच बोर्ड स्वच्छ करा.

उन्हाळ्यात स्वयंपाक करताना किचनमध्ये उभे राहवत नाही? ५ टिप्स, किचन राहील थंड नेहमी

बेकिंग सोडा

स्विच बोर्डवरील डाग काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. यासाठी दोन-तीन चमचे बेकिंग सोडामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण स्वीच बोर्डवर लावा आणि कोरड्या कापडाने चोळून बोर्ड स्वच्छ करा. यामुळे स्विच बोर्डातील घाण काही मिनिटांत दूर होईल.

अन्य उपाय

स्विच बोर्ड साफ करण्यासाठी, घरात व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा नसल्यास, आपण नेल पेंट रिमूव्हर किंवा साबणाच्या पाण्याचा देखील वापर करू शकता. चिकट डाग लवकर निघत नसेल तर, ब्रशचा वापर करा. या गोष्टींमुळे स्वीच बोर्डवरील घाण सहज साफ होईल.

टूथपेस्ट

इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड साफ करण्यासाठी, एका भांड्यात ३ चमचे टूथपेस्ट घ्या, त्यात २ चमचे बेकिंग सोडा घालून मिक्स करा. यानंतर, ही पेस्ट स्विच बोर्डवर लावा. दहा मिनिटांनंतर, टूथब्रश किंवा क्लिनिंग ब्रशने स्विच बोर्ड घासून घ्या आणि नंतर कापडाने पुसून टाका.

साफसफाई केल्यानंतर लगेच कनेक्शन चालू करू नका

स्विच बोर्ड साफ केल्यानंतर लगेच वीज कनेक्शन चालू करू नका. ३० मिनिटानंतर स्वीच चालू करा. यामुळे बोर्ड व्यवस्थित कोरडे होईल व बोर्डमधून शॉक लागणार नाही. पॉवर चालू करण्यापूर्वी, बोर्ड पुन्हा एकदा कोरड्या सुती कापडाने पुसून घ्या, त्यानंतर चालू करा.

टॅग्स :सोशल मीडियाकिचन टिप्ससोशल व्हायरल