किचन हा स्वयंपाकघरातील असा भाग आहे जिथे आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो. किचनच्या स्वच्छतेकडे सगळेच लक्ष देतात. (Tips and Tricks To Clean Switch Boards With Kitchen) दिवसभरातून २ ते ३ वेळा किचन स्वच्छ केले जाते. पण स्विच बोर्डच्या साफसफाईकडे फारसं लक्षणं दिलं जातं. असं पाहिलं जातं की भाजी, मसाले, पाण्याचे डाग पडल्यामुळेस्विच बोर्ड पूर्ण काळेकुट्ट दिसतात स्विच बोर्डला थेट हात लावल्यास करंट लागण्याचीही भिती असते. (How to clean switch board)
स्विच बोर्ड स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी हे काम करा.
स्विच बोर्ड साफ करणं हे कठीण काम नाही साफसफाई करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने स्विच बोर्ड स्वच्छ करू शकता. स्विच बोर्डची स्वच्छता करण्याआधी मेन पॉवर ऑफ करा. मेन पॉवर ऑफ केल्यानंतर घरातील इतर सदस्यांनाही याबाबत सांगा. स्विच बोर्डमधील सर्व बटन्स ऑफ करा. साफसफाईसाठी ग्लोव्हजचा वापर करा.
शेविंग क्रिम
दाढी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेविंग क्रिमचा वापर करून तुम्ही डाग पडलेले स्विच बोर्ड सहज स्वच्छ करू शकता. शेविंग क्रिमचा वापर करण्यासाठी तुम्हाला जास्त पाण्याची गरज लागणार नाही. २ ते ३ चमचे शेविंग क्रिम एका वाटीत काढा. शेविंग क्रिममध्ये टुथब्रश किंवा क्लिनिंग ब्रश बुडवून व्यवस्थित स्विच बोर्डवर लावून ५ मिनिटांपर्यंत तसेच ठेवा. ५ मिनिटांनंतर क्लिनिंग ब्रश रगडून स्वच्छ करा. नंतर स्वच्छ कापडाने स्विच बोर्ड पुसा. तुम्ही शेविंग क्रिममध्ये २ ते ३ चमचे लिंबू घालूनही साफ-सफाई करू शकता.
बेकिंग सोडा
टाईल्स, भिंतीवरचे डाग स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा हा उत्तम उपाय आहे. भारतीय घरांमध्ये जेवण बनवण्यासाठी बेकींग सोड्याचा वापर केला जातो. अशावेळी घाणेरडा स्विच बोर्ड स्वच्छ करण्यासाठी सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये २ ते ३ चमचे बेकींग सोडा घाला. आता त्यामध्ये पाण्याचे काही थेंब घालून हे मिश्रण घट्ट करा. त्यानंतर या मिश्रणात ब्रश बुडवून स्विच बोर्ड स्वच्छ करा.
लिंबाचा रस आणि मीठ
सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये २ ते ३ चमचे लिंबाचा रस घाला. त्यात दीड चमचे मीठ घालून व्यवस्थित मिसळा आणि त्यानंतर ब्रश मिश्रणात बुडवून स्विच बोर्डवर लावा. ५ मिनिटांनी क्लिनिंग ब्रशच्या साहाय्याने रगडून स्वच्छ करा.