उन्हाळा आता चांगलाच जाणवायला लागला आहे. दुपारच्यावेळी तर घरातही खूप गरम वाटतं. सिलिंग पंखेही गरम वारं सोडतात. घराचे दारं- खिडक्या लावून घेतले तरी पंख्यातून गरम वारं येतं. त्यामुळे जीव आणखीनच कासावीस होतो. अशावेळी थंडगार हवा देणाऱ्या कुलरची आठवण येते. त्यामुळे घरातलं जुनं कुलर आपण काढतो. पण ते लावूनही घर काही केल्या म्हणावं तसं गार होत नाही. अशावेळी मग अनेक जण नवं कुलर घेण्याचा विचार करतात. जसा दरवर्षी नवा माठ घेतला जातो, तसंच दरवर्षी नवं कुलर घेण्याची काहीही गरज नसते. म्हणूनच आता या काही ट्रिक्स ट्राय करून पाहा.. त्यामुळे तुमचं जुनं कुलर अगदी थंडगार हवा सोडेल..(tips and tricks to get cool air from your old cooler)
जुन्या कुलरमधून थंडगार हवा येण्यासाठी काय उपाय करता येईल?
१. जुनं कुलर जसंच्यातसं वापरायला काढू नका. ते वापरायला काढण्यापुर्वी त्याची एकदा व्यवस्थित स्वच्छता करा. जर ते कुलर वाळाच्या पडद्यांचं असेल तर वाळा बदलून घ्या. जेणेकरून कुलर अधिक चांगल्याप्रकारे काम करू शकेल.
सनस्क्रिन लावल्यानंतर चेहरा जास्तच काळपट-तेलकट दिसतो? 'या' पद्धतीने लावा- चेहरा दिसेल फ्रेश
२. कुलरमधून किती थंड वारं येत आहे हे त्याच्यामध्ये असणाऱ्या कुलिंग पॅडवर अवलंबून असतं. त्यामुळे जुन्या कुलरचे कुलिंग पॅड बदलून तिथे वे पॅड टाका. यामुळेही हवा थंड येण्यास मदत होईल.
३. कुलरची मोटर आणि पंखा या दोन्ही गोष्टी एकदा व्यवस्थित तपासून घ्या आणि त्याची सर्व्हिसिंग करून घ्या.
गॉगल विकत घ्यायचाय? २०२५ चे ट्रेण्डी डिझाईन्स पाहून घ्या- खरेदी होईल स्टायलिश, आकर्षक
४. कुलर नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथून त्याला बाहेरचं चांगलं वारं लागेल. तुमच्या कुलरचा बाह्य भाग जेवढा जास्त हवेशीर असेल तेवढं तुमचं कुलर जास्त थंड हवा सोडेल.
५. तुम्ही कुलरच्या वॉटर ट्रेमध्ये जर थंडगार पाणी टाकलं तर तुमच्या कुलरमधून जास्त थंडगार वारं येण्यास मदत होईल.. त्यामुळे कुलरमध्ये नेहमी थंडगार पाणी घाला.