कबुतरांनी केलेल्या विष्ठेमुळे आपल्या घराची गॅलरी खराब होते म्हणून आपल्यापैकी काहीजण हैराण आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये सामान्य माणसांनी या कबुतरांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा म्हणून काहीतरी उपाय करण्यासाठी विविध शक्कल देखील वापरल्या होत्या. मोठं मोठ्या मेट्रो सिटीमध्ये कबुतरांचा होणारा त्रास रोखण्यासाठी लोक मिळून अनेक उपाय अजमावताना दिसतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
सहसा आपण बघतो की आपल्या घराला गॅलरी असली की अनेक पक्षी, किटक या गॅलरीत येऊन बसतात. कबुतर हा पक्षी त्यापैकीच एक आहे. काहीवेळा आपण काही दिवसांसाठी घरी नसलो की गॅलरीत येणाऱ्या या पक्ष्यांना बिनधास्तपणे वावरता येत. मग हे पक्षी गॅलरीत येऊन विष्ठा करुन आपली गॅलरी घाण करतात. सध्याच्या मेट्रो सिटीमध्ये कबुतरांचा फारच सुळसुळाट झालेला दिसतो. हे कबुतर आपल्या घरच्या खिडकीमध्ये मध्ये येऊन त्यांचे बस्तान मांडतात. त्याबद्दलही काही नाही. पण जेव्हा ही कबुतर विष्ठा करुन जेव्हा आपली स्वच्छ असलेली गॅलरी खराब करतात तेव्हा मात्र या कबुतरांचा भरपूर राग येतो. अशावेळी ही अस्वच्छ झालेली घराची बाल्कनी कशी स्वच्छ करावी असा प्रश्न आपल्याला पडतो. परंतु सोप्या २ ट्रिक्स वापरुन आपण गॅलरीतील कबुतरांची विष्ठा सहज काढून लगेच गॅलरी स्वच्छ करु शकतो(Tips and Tricks to safely Clean, Disinfect and Discard Pigeon Poop on Your Balcony or Terrace).
कबुतरांच्या विष्ठेतून बुरशी पसरते?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस आणि क्रायटोकॉकस प्रकारची बुरशी सामान्यत: आढळून येते. कबुतरांची विष्ठा पडलेल्या मातीत ही बुरशी सापडते. या कबुतरांच्या विष्ठेमुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. याबाबत बीबीसीशी बोलताना पुण्याच्या साई अलर्जी-अस्थमा रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. विजय वारद सांगतात, 'कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत आहेत. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे अलर्जी होऊ शकते, अस्थमा देखील होण्याची शक्यता असते.'
फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...
आपल्या घराच्या गॅलरीतील कबुतरांची विष्ठा स्वच्छ करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या टबमध्ये पाणी घेऊन यात डिटर्जंट आणि व्हिनेगर समप्रमाणात मिसळून त्यांचे एक मिश्रण तयार करून घ्यावे.
२. हे तयार झालेले मिश्रण आपल्या गॅलरीतल्या फरशीवर ओतावे आणि किमान १० ते १५ मिनिटे ते पाणी फरशीवर तसेच राहू द्यावे.
३. त्यानंतर एक स्क्रबर ब्रश किंवा लादी पुसायचा मॉप घेऊन संपूर्ण फरशी घासून काढावी.
४. त्यानंतर एका टबमध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यात फिनाईल किंवा डेटॉल मिसळून घ्यावेत.
५. हे पाणी ओतून संपूर्ण फरशी पुसून घ्यावी.
उन्हाळ्यात एसीचा वापर वाढल्याने वीज बिल खूप येते? ३ टिप्स, बिल होईल कमी...
घराची गॅलरी, बाल्कनीत पक्षी येऊन घाण करु नयेत म्हणून नेमकं काय करता येईल ?
पक्ष्यांना बाल्कनीत येण्यापासून रोखणे हाच गॅलरी किंवा बाल्कनी स्वच्छ ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. यासाठी तुम्ही तुमच्या संपूर्ण गॅलरीच्या परिसराला जाळीदार पडदे लावून कव्हर करु शकता. जेणेकरुन कबुतर किंवा इतर पक्षी सहज आत येणार नाहीत. बाल्कनीमध्ये व्हिनेगरमध्ये बेकिंग सोडा मिसळून हे मिश्रण एका बाटलीत तयार करुन ठेवा, हे मिश्रण रोज गॅलरीत स्प्रे करा. याचा वास बहुतेक पक्ष्यांना आवडत नाही. हा उपाय २ ते ३ आठवडे नियमित करा, यामुळे कबुतरांचे तुमच्या बाल्कनीत येण्याचे प्रमाण कमी होईल.