Join us  

पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो? लवकर सुकतही नाहीत? ४ जबरदस्त ट्रिक्स, कपडे वाळतील लवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2024 12:52 PM

Tips For Quick Dry And Smell-Free Clothes In The Rainy Season : पावसाळ्यात कपड्यांना येणाऱ्या कुबट वासामुळे हैराण असाल तर ४ ट्रिक्स उपयोगी पडतील.

पाऊस म्हणजे उन कमी ओलावा जास्त (Monsoon). पावसाळ्यात वातावरण थंड आणि सर्वत्र रिमझिम सरी बरसतात. पाऊस जितका हवा हवा वाटतो, आनंदाचे क्षण निर्माण करतो (Smell Free Clothes). त्याच प्रमाणे त्याचे काही तोटे देखील आहेत. पावसात भिजून घरी आल्यानंतर कपड्यातून कुबट गंध येऊ लागतो (Rainy Season).

दमट, थंड वातावरणामुळे कितीही प्रयत्न केले तरी, कपड्यातून कुबट वास जात नाही, आणि ओले कपडे लवकर सुकत नाहीत. या समस्येने अनेकजण हैराण आहेत. अशावेळी कपड्यांचा वास घालवण्यासाठीचे सोपे घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतील. जर कपड्यातून कुबट गंध येऊ नये असे वाटत असेल तर, या टिप्सच्या मदतीने कपडे सुकवा(Tips For Quick Dry And Smell-Free Clothes In The Rainy Season).

उन्हात कपडे वाळत घाला

पावसाळ्यात सर्वत्र दमट वातावरण असते. सूर्यप्रकाश नसते. ज्यामुळे कपडे वाळत नाहीत. अशावेळी जेव्हा सूर्यप्रकाश पडेल, पाऊस थांबेल, तेव्हा कपडे वाळत घाला. सूर्यप्रकाश आणि वारा केवळ कपडे सुकण्यास मदत करीत नाहीत, तर कपड्यातील दुर्गंधीही दूर करण्यास मदत करते.

पावसात बेसनाच्या भज्यांनी त्रास होतो, करा तांदुळाची कुरकुरीत भजी- ‘ही’ पद्धत पाहा-मनसोक्त भजी खा

ओले कपडे एकाजागी गुंडाळून ठेऊ नका

बहुतांश लोक धुण्याचे कपडे एका बादलीत किंवा मशीनमध्ये जमा करुन ठेवतात. ज्यामुळे कपड्यातून कुबट गंध येऊ लागतो. जे धुतल्यानंतरही जात नाही. म्हणून कपडे धुतल्यानंतर लगेच वाळत घाला. किंवा मशीनमध्ये वाळवा.

पंख्याखाली वाळवा

चांगले वेंटिलेशन असेल अशा ठिकाणी कपडे वाळत घाला. वाऱ्यानेही कपडे लवकर सुकतात. जर आपण कपडे घरामध्ये वाळवत असाल तर ते पंख्याखाली वाळवा. यामुळे हवेतील आर्द्रता कमी होईल आणि कपडे लवकर सुकतील.

व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा

नियमित वापर असलेली वॉशिंग पावडर, कपड्यांमधून येणारा कुबट वास दूर करु शकत नाही, यामुळे पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी घालवण्यासाठी डिटर्जंटसोबत पाण्यात थोडे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घाला. यामुळे कपडे स्वच्छ होतील, शिवाय कपड्यातून कुबट वासही येणार नाही.

५ भाज्या नियमित खा, प्रोटीन मिळेल भरपूर- पन्नाशीतही दुखणार नाहीत हाडं- प्रोटीन पॉवरहाऊसची कमाल

कपडे कोरडे होईपर्यंत सुकवा

जर सतत पावसाच्या सरी बरसत असतील; आणि आपण कपडे धुतले असतील तर, हवामान साफ होण्याची वाट पाहू नका. धुतलेले कपडे घरात पसरवून पंख्याच्या खाली वाळवा, सूर्यप्रकाश आल्यानंतर ते बाहेर सुकत घाला.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडियामोसमी पाऊस