प्रत्येकाच्याच घरात पाण्याचे नळ बसवलेले असतात. वारंवार हात लागल्यामुळे नळ खराब होतात तर कधी जास्त जास्तच काळपट दिसून येतात. घाणेरडे काळे नळ साफ करायचं म्हणजे बरीच मेहनत घ्यावी लागते. बाथरूमच्या नळांना गंजाचे किंवा पाण्याचे पांढरे डाग दिसत असतील तर तुम्ही घरगुती सोपे उपाय कर शकता. (How to Clean Bathroom Taps Water)
जेणेकरून नळ नव्यासारखे, चमकदार दिसतील. (How To Clean Bathroom Tap Home Remedies) टॉयलेट, बेसिन किंवा बाथरूमचे नळ चमकवण्यासाठी हा सगळ्यात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. यासाठी तुम्हाला फार खर्चही करावा लागणार नाही. कमीत कमी साहित्यात नळ नव्यासारखा स्वच्छ होईल. (Simple And Effective Tap Cleaning Ideas For Your Home)
एल्यूमिनियम फॉईलचा वापर कसा करावा
जेवण गरम राहण्यासाठी आपण एल्यूमिनियम फॉईलचा वापर करतो. टिफिन पॅकेजिंगसाठीही याचा वापर केला जातो. फॉईल पेपरचा देखिल तुम्ही वापर करू शकता. ज्यामुळे तुमचं काम अधिकच सोपं होईल. इल्यूमिनटी फॉईलने नळ स्वच्छ करणं एकदम सोपं आहे.
बदाम-पनीर रोज खाणं परवडत नाही? १० रूपयांत चारपट जास्त प्रोटीन देतात २ पदार्थ; ताकद येईल
गंज लागल्यानंतर फॉईल पेपरनं स्वच्छ करा
नळांवर पाण्याचे डाग लागले असतील तर हे डाग काढण्यासाठी बेकींग सोडा आणि मीठाचा वापर करू शकता. यासाठी सगळ्यात आधी एल्यूमिनियम फॉईलमध्ये बेकिंग पावडर आणि मीठ घाला एकत्र करून नळांवर लावा. त्यामुळे नळ स्वच्छ दिसेल.
डिशवॉशचा वापर
एल्यूमिनयम फॉईल नसेल तर तुम्ही घाणेरडा नळ चमकण्यासाठी शॅम्पू किंवा डिशवॉशचा वापर करू शकता. शॅम्पू किंवा डिटर्जेंट घेऊन त्याने नळ पुसून घ्या. नळ स्वच्छ होईल आणि चकचकीत दिसेल. बेकिंग सोड्यात शॅम्पू मिसळून नळ स्वच्छ करा. ज्यामुळे नळ चमकदार दिसेल आणि बॅक्टेरियाजपासून मुक्त राहील.
भांड्यांची घिसणी
नळ तुम्ही भांड्याच्या सॉफ्ट घिसणीने धुवू शकता फक्त त्यावर ओरखडे पडणार नाही याची काळजी घ्या. नळ धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या. ज्यामुळे पांढऱ्या पाण्याचे किंवा गंजाचे डाग दिसणार नाहीत. नळांवर तेलाचे, तुपाचे कशाचेही डाग लागले असतील तर लगेच साबणाने स्वच्छ करा. ज्यामुळे बाथरूमही नव्यासारखं दिसेल.