Join us  

देवघर कळकट-चिकट झाले? १ चमचा बेकिंग सोडा, देवघर उजळेल लख्ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2023 11:23 AM

Tips to clean Home Mandir with Baking soda : लाकडी देवघर स्वच्छ करण्यासाठी एक सोपी ट्रिक, वेळखाऊ काम होईल चटकन

सणावाराच्या दिवसात आपण संपूर्ण घराची सफाई करतोच. पण घरातील सफाई करताना काही गोष्टी साफ करण्याच्या राहून जातात. घराची सफाई करताना अनेकदा देवघर (Home Temple) साफ करायचे राहून जाते. आपण देवघरातील मूर्तींचा अभिषेक करतो, पण नियमित देवघर साफ करत नाही.

पणतीच्या धुरामुळे, किंवा तेलामुळेही देवघर चिकट, कळकट होते. देवघर साफ करताना हे डाग लवकर निघत नाही. जर आपल्याला मेहनत न घेता देवघर साफ करायचं असेल तर, काही घरगुती गोष्टींचा वापर करून देवघर स्वच्छ करू शकता. यामुळे काही तासात देवघर स्वच्छ होईल, व मेहनत न घेता देवघर नव्यासारखे दिसेल(Tips to clean Home Mandir with Baking soda).

सर्वप्रथम करा एक काम

सर्वात आधी देवघरातील देवांची मूर्ती व इतर साहित्य काढून ठेवा. देवघर पूर्णपणे खाली करा. जेणेकरून देवघर साफ करताना कोणतीही अडचण येणार नाही.

१ रुपयाचा शाम्पू घ्या आणि चकचकीत करा तुमचे बाथरूम - बेसिन आणि गाडी

हळदी-कुंकूवाचे डाग काढण्यासाठी उपाय

पूजा करताना अनेकदा देवघरावर चंदन किंवा गुलालाचे डाग पडतात, व हे डाग लवकर निघतही नाही. अशा वेळी आपण हे डाग बेकिंग सोड्याचा वापर करून काढू शकता. यासाठी एका वाटीत दोन चमचे बेकिंग पावडर घ्या, त्यात २ कप पाणी घालून पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट एका बॉटलमध्ये भरा, व देवघरावर ज्या ठिकाणी डाग आहेत, त्या ठिकाणी स्प्रे करा. ५ मिनिटानंतर ब्रशने डाग घासून काढा. त्यानंतर कापडाने संपूर्ण देवघर पुसून काढा.

देवघरातील तेलाचे डाग काढण्यासाठी उपाय

पणती लावताना अनेकदा तेलाचे डाग देवघरावर पडतात. किंवा धुरामुळेही देवघर काळपट पडते. हे डाग काढण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत एक कप पाणी घ्या, त्यात २ चमचे व्हिनेगर मिक्स करा. तयार पाणी बॉटलमध्ये भरा, व ज्या ठिकाणी तेलाचे डाग आहेत, त्या ठिकाणी शिंपडा. नंतर ब्रशने घासून डाग काढून, कापडाने देवघर स्वच्छ करा.

घरात झुरळांचे थैमान? वापरून पाहा ४ घरगुती सोपे उपाय, काही मिनिटात कॉकरोच गायब

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाने देखील आपण देवघर स्वच्छ करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. व संपूर्ण देवघरावर शिंपडा. काही वेळानंतर ब्रशने घासून डाग काढा. नंतर कापडाने देवघर स्वच्छ करा. या टिप्समुळे देवघर चकाचक नव्यासारखे दिसेल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल