Lokmat Sakhi >Social Viral > तासंतास मोबाइल पाहता म्हणून नवराबायकोची रोज भांडणं होतात? ५ टिप्स-सुटेल मोबाइलचं व्यसन...

तासंतास मोबाइल पाहता म्हणून नवराबायकोची रोज भांडणं होतात? ५ टिप्स-सुटेल मोबाइलचं व्यसन...

Tips to help you stop checking your phone all the time : How to stop checking mobile constantly : सारखं मोबाईल चेक करण्याची वाईट सवय मोडण्यासाठी खास करावेत असे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2024 06:25 PM2024-10-01T18:25:26+5:302024-10-01T18:48:39+5:30

Tips to help you stop checking your phone all the time : How to stop checking mobile constantly : सारखं मोबाईल चेक करण्याची वाईट सवय मोडण्यासाठी खास करावेत असे उपाय...

Tips to help you stop checking your phone all the time How to stop checking mobile constantly | तासंतास मोबाइल पाहता म्हणून नवराबायकोची रोज भांडणं होतात? ५ टिप्स-सुटेल मोबाइलचं व्यसन...

तासंतास मोबाइल पाहता म्हणून नवराबायकोची रोज भांडणं होतात? ५ टिप्स-सुटेल मोबाइलचं व्यसन...

सध्याच्या काळात मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. मोबाईल वापरण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसेच अनेक तोटे देखील आहेत. अनेकांना मोबाईल फोनची इतकी सवय लागली आहे, की त्यांना मोबाईल फोन शिवाय जमतच नाही. लोकं मोबाईल फोनचा वापर फक्त लांब असलेल्या व्यक्तींसोबत बोलण्यासाठी करत नसून, जेवणाची - वस्तूंची ऑर्डर आणि महत्त्वाचे म्हणेज सोशल मिडिया यांसारख्या गोष्टींसाठी करत आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा यासह मोबाईल फोनही आजच्या काळाची गरज बनली आहे(How to stop checking mobile constantly).

 मोबाईलशिवाय जीवन जगणे सध्या कठीण झाले आहे. मोबाईलमुळे आपले जीवनही खूप सोपे झाले आहे. अनेक गरजांसाठी याचा वापर केला जात असला तरी मोबाईलमुळे आरोग्याचेही खूप नुकसान होत आहे. मोबाईलच्या सततच्या वापरामुळे काहीजण अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. एवढेच नव्हे तर या मोबाईलमुळे आजकाल नातेसंबंध देखील खराब होताना दिसत आहेत. सतत मोबाईल वापरल्यामुळे अनेकांच्या घरात सतत भांडण देखील होतात. मोबाईल मध्ये सारखंच डोकं घालून बसल्याने एकमेकांना बोलायला देखील पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळेच सतत मोबाईल पाहण्याची ही वाईट सवय सोडायची असल्यास आपण काही साधेसोपे उपाय नक्की करुन पाहू शकतो. या उपायांचा वापर केल्याने तासंतास मोबाईल पाहण्याची आपली सवय सोडवण्यास मदत होऊ शकते(Tips to help you stop checking your phone all the time).

सतत मोबाईल चेक करण्याची वाईट सवय सोडवण्यासाठी.... 

१. मोबाईलचे इंटरनेट सारखे ऑन ठेवू नका :- मोबाईलमध्ये असणारे इंटरनेट संपूर्ण दिवसभर सारखेच ऑन ठेवू नका. जर आपण इंटरनेट सारखेच ऑन ठेवले तर त्यावर मेसेजेस, नोटिफिकेशन्स किंवा इतर काही अपडेट हे सारखेच येत राहतील. यामुळे ते पाहण्याचा तुम्हाला सारखा मोह होत राहिल अशावेळी स्वतःला आवर घालणे गरजेचे असते. मोबाईलवर सतत येणारे अपडेट्स तुमचे लक्ष विचलित करतात यामुळेच कोणत्याही महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. यामुळेच मोबाईल इंटरनेट दिवसातून किती वेळ वापरावे याची एक निश्चित वेळ ठरवा. याचवेळी मोबाईल इंटरनेट ऑन ठेवा. यामुळे मोबाईल वापरण्यावर बऱ्यापैकी बंधन येऊ शकते. 

सुईत धागा ओवायचा तर चटकन जमत नाही? ५ ट्रिक्स, एका सेकंदात काम करा फत्ते...

२. दिवसांतील या दोन वेळी मोबाईल वापरणे टाळा :- रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्याबरोबर या दोन वेळी मोबाईल वापरणे कटाक्षाने टाळा. झोपण्यापूर्वी आणि उठल्याबरोबर तुम्ही तुमचा मोबाईल हातात घेतला तर ही सवय तुमची झोप कमी करू शकते. या मोबाईलचा आपल्या झोपेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप न झाल्याने आपल्याला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे दिवसातील या दोन मुख्य वेळी मोबाईल वापरण्याची सवय सोडा. 

३. आपल्या कामात बिझी राहण्याचा प्रयत्न करा :- जेव्हा तुम्हाला मोबाईल हातात घेण्याचा मोह होईल तेव्हा स्वतःला इतर कामांमध्ये बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखादे पुस्तक वाचू शकता, गाणी ऐकू शकता, एखादा छंद जोपासू शकता किंवा घरातील कामे करू शकता, अशा कामांमध्ये स्वतःला व्यस्त करावे. या सर्व गोष्टी तुम्हाला मोबाईलपासून दूर ठेवण्यात आणि तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यास मदत करतील. 

४. सायलेंट मोड ऑन आणि नोटिफिकेशन्स ऑफ ठेवा :- तासंतास मोबाईलवर घालवण्याची सवय सोडवण्यासाठी सायलेंट मोड ऑन आणि नोटिफिकेशन्स ऑफ या फॉर्म्युल्याचा वापर करावा. अनेकदा आपण नोटिफिकेशनचा आवाज ऐकला म्हणून कोणतेही कारण न देता आपला फोन पुन्हा पुन्हा तपासत राहतो. हा उपाय केल्याने यामुळे तुम्हाला सारखं मोबाईल पाहात राहावे लागणार नाही. 

शाळेच्या युनिफॉर्मवर रोज शाईचे डाग? मुलांना ओरडण्यापेक्षा करा २ सोप्या टिप्स, युनिफॉर्म दिसेल नव्यासारखा...

५. मोबाईल नेहमीच्या जागी किंवा लगेच हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवणे टाळावे :- मोबाईलचे व्यसन टाळण्यासाठी तो नेहमीच्या जागी किंवा लगेच हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवणे टाळावे. मोबाईल तुम्ही काम करत असलेल्या डेस्कवर किंवा बेडजवळ ठेवणे टाळा. जर तुम्ही तुमचा फोन शक्यतो  तुमच्या शर्टच्या खिशात ठेवत असाल, तर तो बॅग किंवा पर्समध्ये ठेवावा. याचबरोबर तो तुमच्या बेडरुमपासून थोडा दूर ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्सचे आवाज वारंवार ऐकावे लागणार नाहीत. काहीवेळा आपण एका जागेवर बसल्यानंतर जर फोन आपल्याप्सून लांब असेल तर तो घेण्यासाठी म्हणून जागेवरून उठण्याचा आळस करतो. यामुळे तुमचा फोन तुमच्या नजरेपासून कित्येक तास लांब असतो यामुळे तुम्ही त्यावर कमी प्रमाणांत लक्ष केंद्रित कराल. अशाप्रकारे या सवयींचे पालन केल्यास आपण सतत मोबाईल पाहण्याची सवय मोडू शकतो.

Web Title: Tips to help you stop checking your phone all the time How to stop checking mobile constantly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.