दिवसेंदिवस वातावरणातील उष्णता जास्तच वाढतेय. त्यामुळे घरही थंड ठेवणं कठीण झालंय. बाथरूम, टॉयलेटचा दार उघडताच गरम वाफा बाहेर येतात. उन्हाळ्यात स्वतःला आणि घराला थंड करण्यासाठी काय करता येईल याचाच सर्वजण प्रयत्न करतात. कारण अंघोळीसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी बाथरूममध्ये शिरल्यानंतर अंगाला घामाच्या धारा लागतात. बाथरूममध्ये खोलीसारखे व्हेंटिलेशन नसते. (How To Keep Bathroom Cool) या लेखात बाथरूम, टॉयलेट थंड राहण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. याचा अर्थ असा नाही की बाथरूमध्ये तुम्हाला पंखा लावावा लागणार. घरगुती उपयांच्या मदतीनं तुम्ही टॉयलेट, बाथरूम थंडगार ठेवू शकता. (Tips To Keep Your Bathroom Cool)
१) दिवसा उष्णतेचे प्रमाण जास्त असते आणि खिडक्या उघडल्या जातात, तेव्हा जास्त उष्णता येऊ लागते. खोलीत जर तुमच्या बाथरूममधील खिडकीच्या पट्ट्या उघड्या असतील, तर जास्त गरम होईल, त्यामुळे दिवसा त्यांना बंद ठेवा. काळे पडदे किंवा इन्सुलेटेड विंडो फिल्मसह तुम्ही ते बदलू शकता.
किती टक्के भारतीय महिला आणि पुरुष करतात लग्नाआधी सेक्स? सरकार आकडेवारीच सांगतेय..
२) तुम्हाला तुमच्या बाथरुममधील हवेचे व्हेंटिलेशन सुधारावे लागेल, तरच तुमचे बाथरूम थंड होईल. तुमच्या बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन असल्यास, सर्व गरम हवा बाहेर काढण्यासाठी तो दिवसा आणि संध्याकाळी चालवा. आंघोळ केल्यावर अनेकदा गरम हवा वर येते, ज्यामुळे गुदमरल्यासारखे होते. ही गरम हवा काढून टाकण्यासाठी पंखा लावणे आवश्यक आहे. यासोबतच तुमच्या घरात हवा फिरवण्यासाठी आणि थंड हवा ठेवण्यासाठी स्थिर पंख्याचा वापर करा.
काळे पडलेले स्विच बोर्ड २ मिनिटात होतील स्वच्छ; फक्त ३ उपाय करा, घर नेहमी दिसेल चकाचक
३) आपल्यापैकी बरेच जण बाथरूमचे दरवाजे बंद ठेवतात. जर तुम्हाला तुमच्या खोलीतील हवा बाथरूममध्ये जाऊ द्यायची नसेल तर त्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघडे ठेवा. तसेच, तुम्ही खोल्या वापरत नसल्यास बंद ठेवा.
४) दिवसा तापमान जास्त असते आणि संध्याकाळी तापमानात मोठी घट होते. त्यामुळे संध्याकाळ आणि रात्रीची हवा थंड असते. यावेळी खिडक्या उघड्या ठेवा. जर तुमच्या घरात आणि बाथरूममध्ये रात्रभर थंड हवा फिरत राहिली तर खोलीही थंड राहते. फक्त हे लक्षात ठेवा की तुम्ही सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम तुमची खिडकी बंद केली पाहिजे कारण सकाळी जसजसा सूर्य उगवेल, तसतसे उष्णता वाढू लागेल आणि थंड केलेले बाथरूम पुन्हा गरम होईल.
वॉटर फिल्टर, माठाच्या नळातून सतत पाणी गळतं? ५ ट्रिक्स, पाणी गळणं कायमचं होईल बंद
५) दिवसाही भरपूर प्रकाश असतो, त्यामुळे दिवे लावण्यात काहीच अर्थ नाही. घरातील अनावश्यक दिवे जळल्याने बिलही वाढते आणि उष्णताही वाढते. अनेकदा आपण हेअरस्टाइलिंग टूल्स बाथरूममध्ये ठेवतो आणि वापरतो, ते गरम देखील असू शकते. त्यामुळे दिवे आणि इलेक्ट्रॉनिक्स वापरत नसताना ते बंद करा. तुमचा विश्वास बसणार नाही, पण यामुळे तुमच्या बाथरूम आणि रूमच्या तापमानातही मोठा फरक पडतो.