बहुतांश घरात किचन जास्त मोठे नसते. त्या किचनमध्ये भांडी, किचन साहित्य, किराणा, पाण्याची भांडी, फ्रिज इत्यादी गोष्टी असतात. ज्यामुळे किचन भरल्याभरल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत किचनमध्ये हवेचा शिरकाव होण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. स्वयंपाक करताना साहजिक गरम होतेच. गॅसमधून निघणारी धगधगती आग, व जेवण बनवत असताना त्यातून निघणारी वाफ, या सगळ्या गोष्टींमुळे गृहिणींच्या शरीराची लाही लाही होते.
गॅस चालू असल्यामुळे आपण फॅन देखील चालू करू शकत नाही. या धगधगत्या उन्हाळ्यात स्वयंपाक घरात जेवण बनवणे कठीण जाते. त्यामुळे या जबरदस्त टिप्स फॉलो करा. जेवण बनवत असताना आपल्याला गरमीची समस्या उद्भवणार नाही. व स्वयंपाक घर थंड राहेल(Tips to Keep Your Kitchen Cool During Summer).
गॅस स्टोव्हऐवजी इंडक्शनवर स्वयंपाक करा
बहुतांश घरांमध्ये गॅस स्टोव्हवर अन्न शिजवले जाते. परंतु उन्हाळ्यात त्याचा वापर कमी करायला हवा. कारण ते जास्त उष्णता निर्माण करते. ज्यामुळे स्वयंपाकघरात उभे राहणे कठीण होऊन जाते. अशा परिस्थितीत, स्वयंपाकघर थंड ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्टोव्हऐवजी इंडक्शन गॅसचा वापर करा.
स्वयंपाक करताना एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा
अनेक घरात एक्झॉस्ट फॅन असते. त्याचा वापर आपण फक्त जेवण बनवत असताना धूर झाल्यावर करतो. परंतु, उन्हाळ्यात नेहमी किंवा निदान जेवण बनवत असताना चालू ठेवणे फायदेशीर ठरेल. असे केल्याने किचनमध्ये हवा सर्क्युलेट होते. व उष्णतेमुळे गुदमरल्यासारखे वाटत नाही.
बोटात गच्च अडकलेली अंगठी निघता निघत नाही? ३ उपाय, न दुखता अंगठी निघेल सहज
किचनमध्ये लावा टेबल फॅन
उन्हाळ्याच्या दिवसात टेबल फॅनमुळे किचन थंड राहू शकते. किचनमध्ये सिलिंग फॅन असेल तरी देखील टेबल फॅन ठेवा. कारण सिलिंग फॅनमुळे गॅस कमी होते, किंवा विझते. त्यामुळे टेबल फॅन लावा. आपण जेवण बनवत असताना काही मिनिटे त्याची हवा घेऊ शकता. यामुळे किचन देखील थंड राहते.
इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर कमी करा
इलेक्ट्रिक वस्तूंच्या अतिवापरामुळे खूप उष्णता निर्माण होते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात स्वयंपाकघर थंड ठेवायचे असेल तर, मायक्रोवेव्ह सारख्या उपकरणांचा वापर कमी करा.
फॅनचा खूप आवाज येतोय? ५ उपाय, आवाज होईल कमी - टळेल झोपमोड
किचनच्या खिडक्यांना सुती पडदे लावा
अनेकदा किचनमधील खिडक्यांमधून सूर्याची किरणे थेट घरात येतात. ज्यामुळे किचनमध्ये फार गरम होते. आपल्या स्वयंपाक घरात खिडक्या असतील तर, त्यावर सुती कापडाचे पडदे लावा. तसेच, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर काही वेळ खिडकी उघडी ठेवा. त्यामुळे खोलीत थंडावा राहेल.