अनेकदा घरात भांडी घासण्याचा साबण संपतो. (Tips for hand-washing dishes fast) बाजारात जाऊन साबण आणायला नेहमी वेळ मिळतोच असं नाही. काही सोपे हॅक्स भांडी धुण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Kitchen Hacks) भांडी धुण्यासाठी साबण किंवा लक्विड वापरले जाते. पण काही सोपे उपाय तुम्हाला तुम्हाला लिक्वीड आणि साबणाशिवाय भांडी स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरतील. (Tips for Kitchen Hacks)
बेकींग सोडा
अनेकदा भांडी जळतात आणि त्यात घाण जमा होते अशावेळी साबणाने ते लवकर स्वच्छ होत नाहीत. बेकींग सोडा फायदेशीर ठरू शकतो. सगळ्यात आधी भांडी पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर त्यावर बेकींग सोडा शिंपडून थोडावेळ तसंच राहू द्या. मग स्पंजच्या मदतीनं घासून भांडी स्वच्छ करा.
व्हिनेगर
एका स्प्रे बॉटलमध्ये १ कप पाणी आणि ४ ते ५ चमचे व्हिनेगर घाला. नंतर भांड्यांवर या मिश्रणानं स्प्रे करून थोड्यावेळासाठी तसेच ठेवा. त्यानंतर गरम पाण्याच्या मदतीनं भांडी स्वच्छ धुवून स्वच्छ करा. तुम्ही यात बेकींग सोडा किंवा लिंबाचा रसही घालू शकता. यामुळे भांडी खोलवर स्वच्छ होतील.
राख वापरा
आधीच्या काळात भांडी धुण्यासाठी राखेचा वापर केला जायचा. राखेने भांडी स्वच्छ केल्यानं दुर्गंध अजिबात येत नाही. राख भांड्यांना लावून स्पंजच्या साहाय्यानं ती स्वच्छ करा.
१) भांडी धुण्यापूर्वी हाता ग्लोव्हज घाला. असे केल्याने आपले हात खराब होणार नाहीत आणि थंडीही जाणवणार नाही. ग्लोव्हज मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकार सहज मिळतील, जे तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता. त्याच वेळी, भांडी सिंकमध्ये जमा करून ठेवू नका.
२) जळलेली भांडी स्वच्छ करण्यात बराच वेळ जातो. आपण भांडी पॉलिश करण्यासाठी मीठ वापरू शकता. जळालेली भांडी मीठाने स्वच्छ करणे खूप सोपे आहे. जळालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी मीठ हे सर्वात प्रभावी घटकांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.
३) यानंतर सिंकमध्ये पडलेल्या भांड्यांमध्ये 2 चमचे बेकिंग सोडा टाका. आता भांड्यांवर 2 कप व्हिनेगर घाला.आता 1 कप हायड्रोजन पेरॉक्साइड घ्या आणि एक लिंबू कापून सिंकमध्ये ठेवा. मग सिंक पाण्याने भरा. थोडावेळ भिजण्यासाठी ठेवा. भांडी 15 मिनिटे पाण्यात ठेवाल्यानंतर भांडी स्वच्छ पाण्याने धुवा.