आजकाल आपण सगळेच कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करतो. वॉशिंग मशीनमध्ये कपडे स्वच्छ धुवून निघतात. आपल्याकडील प्रत्येक घरांमध्ये कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिन ही असतेच. मशिनमध्ये वॉशिंग पावडर आणि कपडे घालून टायमर लावावा लागतो. मशिनमध्ये कपडे धुवून पूर्ण वाळण्यासाठी ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. वॉशिंग मशिनमुळे कपडे हाताने धुण्याचा वेळ वाचवता येतो. वॉशिंग मशीनमध्ये आपण सगळ्याच प्रकारचे कपडे धुवू शकतो(6 tips on how to save electricity when using a washing machine).
आपल्यापैकी काहीजण रोज वॉशिंग मशीनचा वापर करतात तर काहीजण आठवड्यातून ठराविक दिवस मशीन लावतात. काहीवेळा वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना आपण सगळे कपडे एकदम एकावेळीच धुवायला लावतो. तर काहीवेळा दोन ते तीन दिवसांचे कपडे साठवून मग आपण ते एकदम एकाच वेळी धुतो. रोज वॉशिंग मशीनचा वापर केल्याने महिना अखेरी वीज बिल जास्त येईल (Tips to save electricity when using a washing machine) या भीतीने काहीजण मशीनचा वापर मर्यादित करतात. वीजबिल जास्त येईल (6 tips to use your washing machine efficiently and bring down the electricity bill) या भीतीने आपण रोज मशीन लावणे टाळतो. परंतु असे होऊ नये म्हणून आपण काही टिप्सचा उपयोग करून, वीजबिल कमी करु शकतो(Top 6 tips to make your washing machine use less electricity).
वीज बिल कमी येण्यासाठी वॉशिंग मशीन वापरण्याच्या काही टिप्स...
१. एकाचवेळी अधिक कपडे धुवा :- वॉशिंग मशीनमुळे येणारे वाढते वीज बिल कमी करण्यासाठी एकाचवेळी अधिक कपडे धुणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी जास्त कपडे धुवून आपण वीज बिल कमी करू शकता. एकाच वेळी अधिक कपडे धुतल्याने आपल्याला मशीन वारंवार चालू आणि बंद करण्याची गरज भासत नाही. याचबरोबर अधिक कपडे आहेत म्हणून एकापेक्षा जास्त वेळा देखील मशीन लावावी लागत नाही. यामुळे ऊर्जेची बचत होते. परंतु या पर्यायाचा वापर करताना आपण मशीनमध्ये गरजेपेक्षा जास्त कपडे एकाच वेळी घालून मशीन ओव्हरलोड तर करत नाही ना याची काळजी घ्यावी.
२. पाण्याचा योग्य वापर करावा :- कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये योग्य तेवढ्या पाण्याचा वापर करावा. कपडे धुण्यासाठी जास्त पाण्याचा वापर केल्याने जास्त इलेक्ट्रिसिटी वाया जाते. यासाठी कमी पाणी वापरले तर कपडे नीट धुवून स्वच्छ होत नाहीत. अशा परिस्थितीत, वॉशिंग मशीनमधील पाण्याची पातळी योग्य तेवढी ठेवावी. कपडे धुण्यासाठी पाण्याचा वापर करताना कपड्यांच्या अंदाजानुसार आवश्यक तेवढ्या पाण्याचा वापर करावा. अशा परिस्थितीत, आपण नेहमी वॉशिंग मशीनमध्ये इतके पाणी ठेवले पाहिजे ज्यामध्ये कपडे पूर्णपणे बुडून जातील.
वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...
३. थंड पाण्यात कपडे धुवा :- मशिनमध्ये गरम पाण्याने कपडे धुतले तर खूप इलेक्ट्रिसिटी लागते, यामुळे खूप वीज वाया जाते. अशावेळी कपडे नेहमी थंड पाण्याने धुवावेत. यामुळे ऊर्जेचा वापर ९०% पर्यंत कमी होतो. एवढेच नाही तर कपड्यांचा रंग खराब होण्यापासून वाचवण्यासाठीही थंड पाणी उपयोगी ठरते.
४. इको मोडवर ठेवून मशीनचा वापर करा :- इको मोडची रचना केवळ इलेक्ट्रिसिटी बचतीसाठी करण्यात आलेली असते. जर तुमच्या वॉशरमध्ये 'इको मोड' असेल तर कपडे धुण्यासाठी त्याचा वापर नक्की करा. हे यंत्राची प्रत्येक प्रक्रिया कमी उर्जेने पूर्ण करते, जी वीज बचतीसाठी खूप महत्त्वाचे ठरते.
कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...
५. हाय स्पीडचा वापर करावा :- कपड्यांमधून पाणी पिळून काढण्यासाठी हाय स्पीडचा वापर केल्याने ते कोरडे होण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो, ज्यामुळे ऊर्जेची बचत होते. याउलट, नाजूक कपड्यांसाठी हाय स्पीडचा वापर करताना त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
६. क्विक सायकल मोडमुळे वीज बिलाची बचत होते :- वॉशिंग मशीनमधील क्विक सायकल मोड हा वॉशिंग सायकल पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी डिझाइन केलेला असतो. यामध्ये कपड्यांवरील मळ हा लगेच काढला जातो त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी होऊन विजेचा वापर खूपच कमी होतो.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्यापूर्वी करा ६ गोष्टी, कपडे भूरकट होणं टाळा...