Join us

तूप कढवल्यानंतर तूपकट भांडं कसं घासणार चटकन? ३ सोप्या टिप्स, भांडं चमकेल सेकंदात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 11:01 IST

Tips & Tricks How To Clean Ghee Greasy Utensils Easily At Home : Utensils Cleaning Hacks : 3 Smart ways to clean greasy utensils : Kitchen Tips: How To Clean Greasy Utensils : दाणेदार - रवाळ तूप तयार झालं, पण चिकट - तेलकट भांडी घासण्याचा कंटाळा येतो, यासाठी पाहा खास टिप्स...

आपल्यापैकी बरेचजण रोजच्या आहारात न चुकता साजूक तूप खातात. काहीजण साजूक तूप विकत आणतात, तर काही घरांमध्ये आजही साजूक तूप घरच्याघरीच काढून स्टोअर केले जाते. घरच्याघरीच साजूक तूप (How To Clean Greasy Utensils) तयार करण्याची एक खूप मोठी प्रक्रिया असते. यासाठी (Tips & Tricks How To Clean Ghee Greasy Utensils Easily At Home) दुधावरची साय १५ ते २० दिवस आधी एका वेगळ्या भांड्यात काढून साठवली जाते. त्यानंतर, ही साठवलेली साय कढवून, त्यावर अजून वेगवेगळ्या प्रक्रिया करुन साजूक तूप तयार करतात. घरीच साय साठवून तयार केलेलं तूप छान, दाणेदार, रवाळ होत( 3 Smart ways to clean greasy utensils).

याचबरोबर एकदा तूप तयार करून ठेवलं तर ते पुढचे काही महिने पुरवठ्याला देखील येतं. परंतु तूप तयार झाल्यावर ते तयार करण्यासाठी वापरलेली चिकट - तेलकट भांडी घासायचा फार कंटाळा येतो. साय साठवून, तूप कढवून भांड्यांना एक प्रकारचा चिकट आणि तेलकटपणा येतो. अशी चिकट - तेलकट झालेली भांडी तासंतास घासून स्वच्छ करावी लागतात. एवढंच नव्हे तर काहीवेळा या भांड्यांतून तुपाचा वास देखील निघत नाही. सगळी भांडी चिकट - तेलकट होऊन त्यातून तुपाचा वास येतो. अशावेळी ही भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण २ सोप्या ट्रिक्स वापरुन ही तेलकट भांडी मिनिटभरात नव्यासारखी लक्ख करु शकतो. तूप कढवल्यानंतर चिकट - तेलकट भांडी स्वच्छ करण्याच्या २ सोप्या ट्रिक्स पाहूयात. 

तूप कढवल्यानंतर चिकट - तेलकट झालेली भांडी कशी स्वच्छ करावीत... 

१. बेकिंग सोडा आणि गरम पाणी :- घरातील तेला - तुपाची चिकट, तेलकट झालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा आणि गरम पाणी इतके साहित्य लागणार आहे. सर्वातआधी पाणी गरम करून, हे गरम पाणी एका मोठ्या टबमध्ये ओतून घ्यावे. आता या गरम पाण्यांत १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. बेकिंग सोडा गरम पाण्यात विरघळवून घ्यावा. त्यानंतर या पाण्यांत, ही तेलकट भांडी १५ ते २० मिनिटे भिजत ठेवावीत. १५ ते २० मिनिटांनी ही भांडी पाण्यांतून काढून लिक्विड सोपं किंवा साबणाने स्वच्छ धुवून घ्यावीत.    

मातीच्या भांड्यांचा तेलकट वास जात नाही, बुरशीही येते? १ भन्नाट ट्रिक, मातीची भांडी स्वच्छ करण्याची पद्धत...

 वाळवी फर्निचर पोखरते आहे? ७ सोपे उपाय - वाळवी होईल नष्ट, लाकडी वस्तू मस्त...

२. लिंबू आणि मीठ :- बेकिंग सोड्याऐवजी आपण लिंबू आणि मिठाचा एकत्रित देखील वापर करु शकता. यासाठी, लिंबू अर्धा कापून त्या लिंबावर मीठ लावून घ्यावे. आता या लिंबू आणि मिठाने थेट चिकट - तेलकट झालेली भांडी घासून घ्यावीत. लिंबातील सायट्रिक ऍसिड अमी मीठ यामुळे भांड्यांवरील तेलातुपाचे चिकट - मेणचट डाग अगदी सहज निघतात. 

३. गरम पाणी आणि लिक्विड सोपं  :- गरम पाणी आणि लिक्विड सोपं यांच्या मदतीने भांड्यांवरील डाग तर जातील, सोबतच भांड्यांना येणारी दुर्गंधी देखील नाहीशी करण्यास मदत होईल. यासाठी एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात १५ ते २० मिनिटे भांडी भिजत ठेवावीत. त्यानंतर एका बाऊलमध्ये गरम पाणी घेऊन त्यात लिक्विड सोपं घालून मिश्रण तयार करून घ्यावे. त्यानंतर, हे मिश्रण आणि घासणीच्या मदतीने तुपाची तेलकट - चिकट भांडी घासून घ्यावीत. या उपायामुळे भांड्यांना येणारा तेलकट - तूपकट वास सहज निघून जाईल.

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्स