दिवाळी (Diwali 2024) हा सणच मुळात दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीत सगळीकडे रोषणाई, झगमगाट, लाईट - दिव्यांचा लख्ख प्रकाश पहायला मिळतो. दिवे, पणत्यांशिवाय दिवाळी पूर्ण होऊच शकत नाही. दिवाळीत आपण रांगोळी आणि दिव्यांची आरास करुन घर, अंगण सजवतो. दिवाळीत दिव्यांच्या सजावटीला फार महत्व असते. आपण दारासमोर रांगोळी काढून त्याभोवती दिवे लावतो तसेच घरच्या खिडक्या, अंगण घराभोवतीच्या परिसरात वेगवेगळ्या डिझाईन्सचे दिवे लावून आपण दिवाळी साजरी करतो. दिवाळीच्या दिवसांत इतक्या दिव्यांची आरास करण्यासाठी या दिव्यात भरपूर तेल व तुपाचा वापर केला जातो(Tips & Tricks This Diwali Light Diya With Water Instead Of Oil Save Money With Simple Trick).
आजकाल वेगवेगळे इलेक्ट्रिक दिवे, पाण्यात चालणारे दिवे, बॅटरीवरचे दिवे, वेगवेगळ्या आकर्षक लाईटिंग बाजारात पाहायला मिळतात. आपण त्या मोठ्या हौशीने खरेदीही करतो. पण जोपर्यंत आपली पारंपरिक पणती अंगणात लागत नाही, तोपर्यंत दिवाळीला काही महत्त्व नाही. अशाप्रकारे दिवे, पणत्या लावल्या की नेमकी एक अडचण होते. सगळ्यात पहिली अडचण म्हणजे पणत्या खूप जास्त तेल शोषून घेतात, त्यामुळे मग तेलही खूप लागते. याचबरोबर तासंतास हे दिवे - पणत्या तेवत ठेवायचे म्हणजे त्यात ठराविक वेळाने तेल - तूप सारखे घालावे लागते. एवढ्या महागाईच्या काळात एवढे तेल पणत्यांसाठी वापरायचे म्हणजे सर्वसामान्य माणसांना खरोखरच जिवावर येते. अशा परिस्थिती, आपण एक सोपा उपाय करु शकतो. हा उपाय केल्यामुळे एकतर तेल - तुपाचीही बचत होईल तसेच सारखे दिव्यात तेल - तूप न घालता देखील दिवा दीर्घकाळसाठी कायम तेवत राहतो. हा उपाय नक्की काय आहे ते पाहूयात(Light a Diwali Diya the Right Way With These 2 Easy Tricks).
दिवे - पणत्या दीर्घकाळ तेवत ठेवण्यासाठी लागेल कमी तेल...
१. दिवे - पणत्या यात कमी तेल वापरूनही दीर्घकाळ तेवत ठेवण्यासाठी ही पहिली ट्रिक. यात आपण सर्वात आधी कापूस वळून त्याच्या वाती तयार करून घ्याव्यात. वाती तयार करत असताना आपण टिश्यू पेपरचा देखील वापर करु शकता. टिश्यू पेपरच्या लांब पट्ट्या कापून घ्याव्यात, कापसाच्या वाती वळताना सोबत टिश्यू पेपरची एक पट्टी घेऊन कापूस आणि टिश्यू पेपर एकत्रित घेऊन वळून वाती तयार कराव्यात. आपण फक्त टिश्यू पेपरच्या लांब पट्ट्या वळून देखील त्याच्या वाती तयार करु शकता. त्यानंतर एका भांड्यात मेणबत्ती घेऊन तिचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे गॅसच्या मंद आचेवर गरम करून मेण वितळवून घ्यावे. या वितळलेल्या मेणात तयार वाती बुडवून त्या संपूर्णपणे भिजवून घ्याव्यात. आता दिवे किंवा पणत्यांमध्ये पाणी ओतून घ्यावे त्यानंतर या पाण्यांत तयार वाती ठेवून त्या काडीपेटीच्या मदतीने प्रज्वलित करुन घ्याव्यात. अशा प्रकारे आपण तेल - तुपाचा वापर न करता देखील दीर्घकाळ तेवत राहणारे दिवे - पणत्या लावू शकता.
कोण म्हणते अनारसा करणे कठीण काम? ही घ्या झटपट अनारसे करण्याची कृती, खा जाळीदार अनारसे...
दिवाळीसाठी झटपट वाती करण्याच्या ३ ट्रिक्स, किचकट काम करा फक्त १० मिनिटांत आणि वातीही होतील सुंदर...
२. या दुसऱ्या ट्रिकमध्ये, कापसाच्या वाती तयार करून घ्याव्यात. आपण फुलवात किंवा लांबवात अशा दोन्ही प्रकारच्या वाती करु शकता. या वाती तयार झाल्यावर त्या एका बाऊलमध्ये ठेवून त्यात आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप घालावे. या वाती तेल किंवा तुपात आहे तशाच बुडवून ठेवाव्यात. त्यानंतर दिवे किंवा पणत्या घेऊन यात पाणी ओतून घ्यावे. पाणी अगदी काठोकाठ भरु नये. पाणी ओतल्यानंतर यात वरुन चमचाभर तेल किंवा तूप घालावे. मग तेल - तुपात भिजवून ठेवलेल्या वाती यात लावल्यात मग दिवे पणत्या प्रज्वलित करून घ्याव्यात.
या दोन सोप्या ट्रिक्स वापरून आपण दिवाळीला कमी तेल तुपाचा वापर करूनही दिवे - पणत्या दीर्घकाळ तेवत ठेवू शकतो.