Join us  

साडीची घडी ‘अशी’ घाला झटपट, पाहा भन्नाट ट्रिक! कपाटही दिसेल आवरलेलं- साड्या राहतील नव्याकोऱ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2024 4:07 PM

How To Organize Saree Cabinet : Best Way To Organise Your Saree Wardrobe : What is a good way to organize and store saree : Saree Organization Ideas & Tips : Tips & tricks to organize your sarees : साड्या कपाटांत नीट ठेवण्यासाठी पाहा ही ट्रिक...

आपल्या सगळ्यांच्याच कपाटात अनेक प्रकारच्या साड्या असतात. परंतु या साड्या कपाटात व्यवस्थित ऑर्गनाईझ करुन ठेवायच्या कशा असा प्रश्न प्रत्येकीला सतावतो. या कपाटातील साड्यांचा पसारा कितीही आवरला तरीही कपाट कधी नीट लावलेच जात नाही. या कपाटातील साड्यांच्या गर्दीत काहीवेळा साडीवरचा ब्लाऊज, परकर देखील हरवतात. अशा परिस्थितीत, आयत्या घाईच्या वेळी साडी एकीकडे, ब्लाऊज एकीकडे आणि परकर तर अजून दुसरीकडे अशी वेळ येते(How To Organize Saree Cabinet).

साड्या कितीही व्यवस्थित आवरुन घडी घालून ठेवल्या तरीही त्यांची घडी विस्कटून त्या कपाटात अस्ताव्यस्त पसरतात. या इतक्या महागामोलाच्या साड्या (Best Way To Organise Your Saree Wardrobe) आपण विकत घेऊन जर त्या व्यवस्थित घडी घालून ठेवल्या नाहीत तर त्या खराब होतात. अशा साड्या चुरतात, काहीवेळा त्या नीट न ठेवल्याने त्यावरील डिझाइन्स किंवा हेव्ही वर्क, धागा वर्क खराब होण्याची शक्यता असते. यासाठीच, कपाटात साड्या नीट ऑर्गनाईझ करण्यासाठी तसेच कमी जागेतही साड्या व्यवस्थित ठेवण्यासाठी साड्यांची एका विशिष्ट पद्धतीने घडी(Tips & tricks to organize your sarees) घालावी लागते. साड्या कपाटांत नीट ऑर्गनाईझ करुन ठेवण्यासाठी साड्यांची कशी घडी घालायची ते पाहूयात(What is a good way to organize and store saree).

साड्यांची घडी घालण्याची सोपी ट्रिक... 

कपाटांत साड्या व्यवस्थित नीट ऑर्गनाईझ करुन ठेवण्यासाठी साड्यांची एका विशिष्ट पद्धतीने घडी घालावी लागते. कपाटात साड्यांचा पसारा होऊ नये म्हणून त्याची घडी घालण्याची सोपी ट्रिक virtualdiva.official या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.

ड्रेसच्या पॅटर्ननुसार ओढणी ड्रेपिंगच्या ७ अनोख्या पद्धती, येईल फेस्टिव्ह लूक- चारचौघीत दिसाल सुंदर! 

सर्वातआधी साडीची आपण नेहमीप्रमाणे घडी घालतो तशी घडी घालूंन घ्यावी. त्यानंतर साडीच्या आडव्या घडीत आत परकर ठेवावा. साडीची आडवी घडी घालून त्यात परकरची लहानशी घडी घालून ठेवावा. आता साडीच्या आत परकर ठेवून वर साडीची अजून एक आडवी घडी घालून घ्यावी. त्यानंतर त्या साडीचा ब्लाऊज घेऊन त्याची संपूर्ण बटण उघडून तो एका सपाट पृष्ठभागावर व्यवस्थित अंथरुन घ्यावा. आता या ब्लाऊजमध्ये चौकोनी घडी घालून घेतलेली साडी व्यवस्थित ठेवावी. आता या ब्लाऊजची बटण लावून साडी या ब्लाऊज मध्ये व्यवस्थित बसेल अशी पॅकिंग करून घ्यावी. त्यानंतर या ब्लाऊजच्या दोन्ही बाह्या आतल्या बाजूने दुमडून घेऊन साडीच्या घडीच्या आत ठेवाव्यात. जर आपल्या ब्लाऊजला मागच्या बाजूने जशी लटकनची दोरी असते तशी असेल तर या दोरीच्या मदतीने साडी आणि ब्लाऊज एकत्रित बांधून घ्यावे.  

महागडी साडी तर घेतली पण ब्लाऊजसाठी फॅशनेबल गळा शिवायचाय? ७ प्रकार-नवेकोरे फॅशनेबल पॅटर्न...

कितीही पिळलं तरी संपत आलेल्या ट्यूबमधली सगळी क्रिम निघत नाही? पाहा ‘ही’ ट्रिक- भन्नाटच...

अशा प्रकारे आपण ही सोपी ट्रिक वापरून साडीची घडी घालू शकता. अशी घडी घातल्याने साडी, ब्लाऊज आणि परकर कपाटात कुठेही न हरवता एकाच वेळी न शोधता पूर्ण सेट पटकन मिळू शकतो. त्याचबरोबर, साडीची व्यवस्थित घडी घातल्याने आपण कपाटात या साड्या नीट ऑर्गनाईझ करुन ठेवू शकतो. यामुळे घाईच्यावेळी साडीवरचे ब्लाऊज, परकर शोधण्यात वेळही वाया जाणार नाही.

टॅग्स :सोशल व्हायरलफॅशनस्टायलिंग टिप्स