Lokmat Sakhi >Social Viral > कोल्ड ड्रिंकची अर्धी बाटली फ्रिजमध्ये ठेवली तरी गॅस उडून जातो? पाहा २ उपाय-चवही बदलणार नाही!

कोल्ड ड्रिंकची अर्धी बाटली फ्रिजमध्ये ठेवली तरी गॅस उडून जातो? पाहा २ उपाय-चवही बदलणार नाही!

To preserve gas in soda and cold drinks, you can try these tips : How to store soft drinks in your refrigerator : Hacks to Keep Your Soft Drinks Fizzy for a Longer Time : कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या विकत आणतो, पण अर्धवट बाटल्यांतल्या पेयांना काही चवच उरत नाही, त्यासाठी हे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 05:56 PM2024-10-14T17:56:29+5:302024-10-14T18:13:07+5:30

To preserve gas in soda and cold drinks, you can try these tips : How to store soft drinks in your refrigerator : Hacks to Keep Your Soft Drinks Fizzy for a Longer Time : कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या विकत आणतो, पण अर्धवट बाटल्यांतल्या पेयांना काही चवच उरत नाही, त्यासाठी हे उपाय

To preserve gas in soda and cold drinks, you can try these tips How to store soft drinks in your refrigerator Hacks to Keep Your Soft Drinks Fizzy for a Longer Time | कोल्ड ड्रिंकची अर्धी बाटली फ्रिजमध्ये ठेवली तरी गॅस उडून जातो? पाहा २ उपाय-चवही बदलणार नाही!

कोल्ड ड्रिंकची अर्धी बाटली फ्रिजमध्ये ठेवली तरी गॅस उडून जातो? पाहा २ उपाय-चवही बदलणार नाही!

सध्या सणावाराचे दिवस सुरु आहेत. सणवार म्हटलं की घरात पाहुण्यांची कायम ये - जा असते. घरी पाहुणे आल्यावर त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करणे हे मुख्य काम असते. पाहुणचार करताना आपण त्यांना चहा, कॉफी किंवा थंड सरबत, कोल्ड ड्रिंक पिण्याचा आग्रह करतो. पाहुण्यांना गोडाधोडाचे पदार्थ तर आपण खायला देतोच, पण त्याचबरोबर पिण्यासाठी काहीतरी थंड म्हणून कोल्ड ड्रिंक देखील देतो. या खास सणावारानिमित्त आपल्या फ्रिजमध्ये (Keep Your Drinks Carbonated for Days) आपण वेगवेगळ्या कोल्ड ड्रिंक्सच्या मोठ्या बाटल्या आणून ठेवतो(How to store soft drinks in your refrigerator).

या बाटल्या एकदा उघडल्यावर आपण एकाचवेळी त्यातील सगळे कोल्ड ड्रिंक संपवत नाही. या बाटल्यांमध्ये काहीवेळा कोल्ड ड्रिंक उरते, हे उरलेले कोल्ड ड्रिंक आपण बाटलीचे झाकण लावून पुन्हा बाटली तशीच फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु एकदा या बाटलीचे झाकण उघडून नंतर पुन्हा बाटली तशीच फ्रिजमध्ये ठेवल्याने या कोल्ड ड्रिंक मधील गॅस उडून जातो. परिणामी, या कोल्ड ड्रिंक्सची चव बदलते. कोल्ड ड्रिंक्सची बाटली वारंवार उघडल्यानंतर पुन्हा तशीच फ्रिजमध्ये ठेवली की त्यातील गॅस उडून कोल्ड ड्रिंकची (Hacks to Keep Your Soft Drinks Fizzy for a Longer Time) चव वेगळीच लागते. अशावेळी आपण नेमके काय करावे हे समजत नाही. कारण असे चव नसलेले कोल्ड्रिंक्स पाहुण्यांना देता येत नाही त्यामुळे ही कोल्ड ड्रिंक्सची बाटली अशीच फ्रिजमध्ये पडून राहते. यासाठीच, कोल्ड ड्रिंक्सच्या बाटलीचे झाकण एकदा उघडल्यानंतर त्यातील गॅस उडून जाऊ नये व त्याची चव बदलू नये म्हणून एक खास ट्रिक उपयोगात येऊ शकते(To preserve gas in soda and cold drinks, you can try these tips).

१. कोल्ड ड्रिंकच्या बाटलीतील गॅस उडून जाऊ नये यासाठी काय करावे ? 

 कोल्ड ड्रिंक च्या बाटलीचे झाकण एकदा उघडले की त्यातील गॅस निघून जातो. या कोल्ड ड्रिंक्स मधील गॅस उडून गेल्यानंतर त्याची चव बदलते, चव बदलल्यानंतर असे कोल्ड ड्रिंक प्यावेसे वाटत नाही. अशावेळी कोल्ड ड्रिंकच्या बाटलीमधील गॅस उडून न जाता त्याची चव बदलू नये म्हणून करावी अशी सोपी ट्रिक पाहूयात. 

कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचे झाकण एकदा उघडल्यानंतर त्यातील गॅस उडून जाऊ नये म्ह्णून ही सोपी ट्रिक नक्की करून पाहा. कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचे झाकण एकदा उघडल्यानंतर, हवे तेवढे कोल्ड ड्रिंक काढून घेतल्यावर पुन्हा झाकण लावताना बाटलीच्या बरोबर मधोमध हातांनी दाब देत बाटली थोडी प्रेस करून घ्यावी. बाटली दोन्ही हातांनी प्रेस केली असतानाच बाटलीचे झाकण लावून घ्यावे, आणि अशी बाटली फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावी. या सोप्या ट्रिकमुळे बाटली कोल्ड्रिंक कोल्ड ड्रिंकची चव बिघडत नाही.  

फक्त थेंबभर तेलात तळा पापड! भरपूर तेल नसेल तरी कुरकुरीत पापड तळण्याची नवी युक्ती...  


कटलेट्स-पॅटिस क्रिस्पी -कुरकुरीत आणि चविष्ट हाेण्यासाठी ६ उपाय, गार झाल्यावरही मऊ पडणार नाहीत...

यासोबतच एक दुसरी सोपी टीप म्हणजे कोल्ड ड्रिंकची बाटली फ्रिजमध्ये ठेवताना,ती सरळ उभी किंवा आडवी ना ठेवता उलटी ठेवा. उलटी म्हणजे बाटलीचे झाकण खालच्या बाजूला व बाटलीचा तळ वरच्या बाजूला अशा प्रकारे बाटली फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावी. यामुळे बाटलीतील गॅस हा बाटलीच्या तळाशी स्टोअर होऊन राहतो. परिणामी, बाटलीचे झाकण उघडल्यांनंतर तो गॅस लगेच बाहेर पडत नाही.   

२.  म्हणूनच कोल्ड्रिंकच्या बाटलीचा तळ हा कधी सपाट नसतो कारण... 

आपण पाहिले असेल की, शक्यतो कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचा तळ हा कधी सपाट नसतो. यामागे देखील एक वेगळे कारण असते. कोल्ड ड्रिंक कोणत्याही प्रकारचे असो त्यात कार्बोनेट म्हणजेच गॅसचे प्रमाण सर्वात जास्त असते. कोल्ड ड्रिंकमध्ये गॅस असल्याने त्यात जास्त प्रमाणात दबाव असतो. जेव्हा असे जास्त दबाव असलेले कोल्ड ड्रिंक सपाट पृष्ठभाग असणाऱ्या बाटलीत भरले जाते तेव्हा या पृष्ठभागावर दबाव येऊन बाटली फुटण्याची शक्यता असते. याचबरोबर जेव्हा असे गॅसचे प्रमाण जास्त असणारे कोल्ड ड्रिंक आपण फ्रिजमध्ये ठेवतो तेव्हा ते अधिक प्रमाणात प्रसारण पावते यामुळे बाटलीच्या पृष्ठभागावर दबाव येतो. यासाठीच कोल्ड ड्रिंक्सच्या बाटलीचे पृष्ठभाग हे सपाट नसून थोडे रुंद व मोठे असतात. यामुळे जर कोल्ड ड्रिंक गॅसच्या दबावाने अधिक जास्त प्रसरण पावले तर बाटली न फुटता ते बाटलीत व्यवस्थित राहावे यासाठी कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचा तळ हा कधी सपाट नसतो.

Web Title: To preserve gas in soda and cold drinks, you can try these tips How to store soft drinks in your refrigerator Hacks to Keep Your Soft Drinks Fizzy for a Longer Time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.