Lokmat Sakhi >Social Viral > हात न लावता टॉयलेट साफ करायचंय? १ चमचा 'ही' पावडर घाला-टॉयलेट होईल नव्यासारखं-क्लिन

हात न लावता टॉयलेट साफ करायचंय? १ चमचा 'ही' पावडर घाला-टॉयलेट होईल नव्यासारखं-क्लिन

Toilet Cleaning Tips Without Scrubbing (Toilet saf karayche upay) : टॉयलेट वॉशिंग ट्रिक्स युज करायला हव्यात. ज्यामुळे बाथरूमची साफसफाई व्यव्सथित होईल आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 04:23 PM2023-11-17T16:23:06+5:302023-11-18T17:41:36+5:30

Toilet Cleaning Tips Without Scrubbing (Toilet saf karayche upay) : टॉयलेट वॉशिंग ट्रिक्स युज करायला हव्यात. ज्यामुळे बाथरूमची साफसफाई व्यव्सथित होईल आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. 

Toilet Cleaning Tips Without Using Brush Or Hands : Cleaning Toilets Without a Brush | हात न लावता टॉयलेट साफ करायचंय? १ चमचा 'ही' पावडर घाला-टॉयलेट होईल नव्यासारखं-क्लिन

हात न लावता टॉयलेट साफ करायचंय? १ चमचा 'ही' पावडर घाला-टॉयलेट होईल नव्यासारखं-क्लिन

जेव्हा  टॉयलेट किंवा बाथरूम स्वच्छ करण्याची वेळ येते तेव्हा कोणीतरी येऊन  हे काम केलं तर बरं होईल असं वाटतं. (Cleaning Hacks) जर टॉयलेट पॉट स्वच्छ नसेल तर स्वच्छतेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. (Toilet kase saaf karayche) याशिवाय  टॉयलेट साफ करणं किळसवाणं वाटतं ते वेगळंच. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट क्लिनर्स उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा नाही की हे टॉयलेट क्लिनर्स आपल्या वॉशरूमसाठी बेस्ट ठरतील. (Cleaning tips)

टॉयलेट क्लिनर्सच्या उग्र वासामुळे अनेकजण याचा वापर करत नाहीत. अनेकदा टॉयलेट पॉटमध्ये केमिकल्सयुक्त क्लिनर घातल्यानंतर शिंका येणं, दम लागणे अशा एलर्जीक रिएक्शन्स जाणवतात. (How to Clean a Toilet The Right Way) एसिडने साफ-सफाई केल्यास इतर अनेक समस्या उद्भवू शकतात हे धोकादायक ठरू शकतं.  यासाठी टॉयलेट वॉशिंग ट्रिक्स युज करायला हव्यात. ज्यामुळे बाथरूमची साफसफाई व्यव्सथित होईल आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.  (Cleaning Toilets Without a Brush)

टॉयलेट पॉटमध्ये घाला डिटर्जेंट

जर तुमच्या घरातील टॉयलेट पॉटमध्ये काळे पिळे डाग पडले असतील आणि तुम्ही हे डाग व्यवस्थित साफ करू शकत नसाल  तर टॉयलेट पॉटमध्ये पावडर घातल्यानं तुमचं काम सोपं होईल. टॉयलेट धुण्याच्या आदल्या रात्री एक मोठा चमचा डिटर्जेंट पाडवर टॉयलेट पॉटमध्ये घालून ठेवा. पॉटमध्ये ज्या ज्या ठिकाणी पिळे डाग आहेत तिथे हे मिश्रण घाला. गरजेनुसार तुम्ही थोडं पावडर आणि पाणी अजून घालू शकता. रात्रभर तसंच ठेवा फ्लश करू नका.

पोटाच्या टायर्समुळे अख्खं शरीर बेढब झालंय? ५ दिवस ५ गोष्टी करा, आपोआप सपाट होईल पोट

सकाळी उठून थोडं पाणी घालून ब्रशनं स्क्रब करा. यातून तुम्हाला दिसून येईल की टॉयलेट पॉटचा पिवळेपणा दूर झाला आहे. जर टॉयलेट जास्त पिवळं पडलं असेल तर हा उपाय २ ते ३ दिवस सातत्याने करा. हे करण्यासाठी तुम्हाला फक्त ५ मिनिटं लागतील.

टॉयलेट पॉटमध्ये या पद्धतीने घाला टॅल्कम पावडर

घरातील सौंदर्य प्रसाधनांमध्ये असलेले टॅल्कम  पावडर तुमचं टॉयलेट सुंदर बनवू शकते. टॉयलेटमध्ये १ चमचा टॅल्कम पावडर घाला. यामुळे  दुर्गंध येणार नाही. टॉयलेट पॉट  साफ करण्यासाठी तुम्ही चेहऱ्याला लावण्याच्या पावडरचा वापर करू शकता. यामुळे टॉयलेटमध्ये दुर्गंध येणार नाही. हा उपाय करण्यासाठी १ तासाच्या आत टॉयलेट पॉटमध्ये पावडर घालून तसंच सोडून द्या. एक तासाने साध्या पाण्याने फ्लश करून टॉयलेट पॉटमधून येणार दुर्गंध कमी होईल.

चपात्या फुगत नाही-वातड होतात? पीठ मिळताना 'हा' पदार्थ मिसळा, खा मऊसूत-परफेक्ट चपात्या

टॉयलेट पॉट स्वच्छ करण्यासाठी इतर उपाय

१) टॉयलेट पॉटमध्ये ब्राऊन स्पॉट्स पडले असतील तर अर्धा कप व्हिनेगरमध्ये २ चमचे बेकिंग सोडा मिसळा आणि साफ करा. असं केल्यानं टॉयलेट अगदी पटकन क्लिन होईल.

२) हे पिवळे डाग जात नसतील तर तुम्ही मीठ आणि व्हिनेगरचं मिश्रण  बनवा आणि रात्रभरासाठी टॉयलेटमध्ये तसंच सोडून द्या. सकाळी पाणी घाला. सकाळपर्यंत सर्व क्लिन झालेलं दिसेल.

Web Title: Toilet Cleaning Tips Without Using Brush Or Hands : Cleaning Toilets Without a Brush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.