Join us  

ब्रश न लावता, हात खराब न करता टॉयलेट स्वच्छ करण्याच्या ४ ट्रिक्स; नव्यासारखं, स्वच्छ होईल कमोड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 2:16 PM

Toilet Seat Cleaning Tips : घर कितीही साफ असेल आणि टॉयलेट घाणेरडं असेल तर पाहूण्यांसमोर लाजिरवाणे वाटू शकते.

टॉयलेट सीट साफ करण फार महत्वाचे असते. जर टॉयलेट अस्वच्छ असेल संपूर्ण घर घाणेरडं होऊ शकतं. ज्यामुळे तब्येतीवर चुकीचा परिणाम होतो. यातील बॅक्टेरियाजमुळे गंभीर आजार उद्भवू शकतात. (Toliet Seat Cleaning Tips) बाधरूमध्ये  जर दुर्गंध आला तर सगळ्यांचाच मूड खराब होतो. (Toilet Seat Stain Removal Tips) घर कितीही साफ असेल आणि टॉयलेट घाणेरडं असेल तर पाहूण्यांसमोर लाजिरवाणे वाटू शकते. टॉयलेट सीट स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक पाहूया. (How To Clean Dirty Toilet Seat)

1) ग्लिसरिन आणि व्हिनेगर

मेहनत न करता टॉयलेट सीट स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एक कप ग्लिसरिनमध्ये व्हाईट व्हिनेगर घालून मिक्स करा. नंतर त्यात थोडा लिंबू घाला. त्यानंतर हे सर्व साहित्य एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. नंतर ब्रशने रगडून स्वच्छ करा.  त्यानंतर बॅक्टेरियांजचा धोक कमी होतो. 

2) सोडा वापरा

टॉयलेट सीट चमकवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी ४ चमचे सोडा घेऊन अर्धा कप पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा.  नंतर टॉयलेट सीटवर पसरवून सोडून द्या. त्यानंतर जवळपास १५ ते २० मिनिटं ब्रशच्या मदतीने साफ करा. ज्यामुळे हट्टी डाग निघून जातील.

जिना चढताना जम जातो-चालताना धाप लागते? लगेच १ काम करा, ठणठणीत राहाल, दम लागणार नाही

3) क्लिनिंग टॅब्लेट

खूप कमी लोकांना माहिती असते की क्लिनिंग टॅबलेटचा वापर करून तुम्ही टॉयलेट सीटवर जमा झालेली घाण स्वच्छ करू शकता.  या पद्धतीने दूर करण्यास मदत होते.  याच्या वापराआधी तुम्ही टॅबलेट्सच्या पॅकेट्सवरचे इंस्ट्रक्शन्स तुम्ही पाहू शकता.  तुम्हाला साफ-सफाई करण्यासाठी ब्रशची गरजही लागणार नाही. 

जिना चढताना जम जातो-चालताना धाप लागते? लगेच १ काम करा, ठणठणीत राहाल, दम लागणार नाही

4) बोरेक्स आणि लिंबू

टॉयलेट सीट काही मिनिटांमध्ये चमकवण्यासाठी  तुम्ही  बोरेक्स आणि लिंबाचा रस वापरू शकता. यासाठी ३ ते ४ चमचे बोरेक्स पावडर घ्या. नंतर यात लिंबाचा रस घालून टॉयलेट सीटवर घालून अर्ध्या तासासासाठी तसंच सोडून द्या. त्यानंतर ब्रश न वापरता कापडाच्या मदतीने सीट साफ करून घ्या. या पद्धतीनं टॉयलेट स्वच्छ केल्यास नव्यासारखं दिसेल.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया