Join us  

टोल नाक्यावर ट्रकनं जोरदार धडक दिली; जीवाची बाजी लावून तरुणी मदतीला धावली, पाहा व्हिडिओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:56 PM

Toll Plaza Accident : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही या तरूणीचं खूप कौतुक कराल.

महामार्गावर वाहन चालकाच्या चुकीमुळे किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे बरेच अपघात  होतात. अशा दुर्घटनांमध्ये विनाकारण निष्पाप जीवांना प्राण गमावावे लागतात. (Truck hit hard on toll plaza) तर कधी नशिब बलवत्तर म्हणून काहीजण या संकटातूनही सुखरूप वाचतात. अशाच एका अपघाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही या तरूणीचं खूप कौतुक कराल. (Truck hit hard on toll plaza regardless of life girl saved the life of the person watch viral video)

एक ट्रक खूप वेगाने येतो आणि टोल प्लाझाच्या आत जोरात शिरतो. त्याचवेळी ट्रकसमोर एक कार उभी असते. ट्रकच्या धडकेने एक ते दोन कर्मचारी टोल प्लाझाच्या आत अडकतात. (Toll Plaza Accident) शेजारी उभ्या असलेल्या मुलीने हे पाहिल्यावर ती जीवाची पर्वा न करता आत जाते आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे, ज्याचे लोकांकडून कौतुक होत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्याला 3 लाख लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना माहितीही देण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे - काळजीपूर्वक पाहा. डेहराडूनच्या टोल प्लाझा दुर्घटनेत एका तरुणीने जीवाची पर्वा न करता बूथच्या आत असलेल्या कर्मचाऱ्याला  वाचवले. 

या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले - या मुलीने आपल्या शौर्याने मन जिंकले आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले आहे - खरोखर आनंदी व्हिडिओ. आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  तिच्या प्रसंगावधामुळे आज एका व्यक्तीचा जीव वाचल्यामुळे सोशल मीडिया युजर्स तिचे भरभरून कौतुक करत आहेत. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलअपघातटोलनाका