लिंबू व्हिटामीन सी (Lemon Peels) ने परीपूर्ण असतो. लिंबानं त्वचेला बरेच फायदे मिळतात. लिंबू पाणी असो किंवा कोणतंही सॅलेड, हर्बल ड्रिंक, लिंबाच्या रसाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. (Benefits And Uses Of Lemon Peels). पण लिंबाची सालं खराब समजून फेकून देण्याची चूक करू नका. लिंबाची सालं सुकवून तुम्ही अनेक प्रकारच्या कामांसाठी याचा वापर करू शकता. लिंबाच्या सालींचा कोण कोणत्या प्रकारे वापर केला जातो ते समजून घेऊ. (Top 5 Benefits And Uses Of Lemon Peels)
लिंबाच्या सालीचा चहा
व्हिटामीन सी ने परीपूर्ण लिंबाच्या सालीचा चहा बनवून तुम्ही पिऊ शकता. लिंबाची सालं पाण्यात घालून चहा बनवून गाळून या चहाचे सेवन करा. या चहात गरजेनुसार हलकं मध मिसळा. हा चहा प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते, जळजळ कमी होते, इम्यूनिटी चांगली राहून फायदे मिळतात. घसा, खोकला यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा चहा बनवून पिऊ शकता.
नॅच्युरल क्लिंजर बनवा
लिंबाच्या सालीतील हाय सिट्रिक कंटेंट, एंडी बॅक्टेरिअल गुण आणि एंटी सेप्टीक एजेंट त्याला क्लिनिंग एजेंट बनवतात. हे नॅच्युरल क्लिंजर वापरून तुम्ही सिंक, भांडी, प्लास्टीकच्या वस्तू साफ करू शकता. हे क्लिंजर तयार करण्यासाठी व्हाईट व्हिनेगरमध्ये लिंबाची सालं घालून काहीवेळ वेगळं ठेवा. नंतर हे मिश्रण वापरून नॅच्युरल क्लिंजर किंवा ऑल पर्पस क्लिनर तयार करू शकता.
फेस पॅक कसा तयार करावा
लिंबाची सालं सुकवून याची पावडर बनवा. नंतर या पावडरचा वापर तुम्ही चेहऱ्यावर करू शकता. लिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये मध, गुलाबपाणी किंवा दूध मिसळून ही पेस्ट बनवा, नंतर चेहऱ्याला १५ ते २० मिनिटं लावून ठेवून चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. या फेस पॅकमुळे चेहऱ्यावर ग्लो येईल. स्किन एक्सफोलिएट होईल आणि डाग निघून जाण्यास मदत होईल.
रूम फ्रेशनरप्रमाणे याचा वापर करा
लिंबाच्या सालीचा सुगंध आणि अरोमा यामुळे एक उत्तम रूम फ्रेशनर तयार करता येते. ही सालं सुगंधानं परीपूर्ण असतात. लिंबाच्या सालींना घरातील छोट्या भांड्यात किंवा पॉटमध्ये वगैरे घालून ठेवू शकता. ज्यामुळे घराच्या संपूर्ण कोपऱ्यात या रूम फ्रेशनरचा सुंगध दरवळत राहील. ज्यामुळे किटक, मुंग्या, झुरळं घरात शिरणार नाहीत.