उन्हाळ्यात मच्छरांचा त्रास अधिक पटीने वाढतो. घरातील कानाकोपऱ्यात जाऊन मच्छर बसतात, व झोपण्याच्यावेळी बाहेर येतात. मच्छरांमुळे प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. घरातून मच्छर पळवून लावण्यासाठी बाजारात काही प्रॉडक्ट्स मिळतात. काही प्रॉडक्ट्स मच्छर पळवून लावतात, तर काही नाही. काही प्रॉडक्ट्स आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात.
घरातून मच्छर पळवून लावायचं असेल तर, घरात ही ५ झाडे लावा. या झाडांमुळे डास घरात शिरकाव करणार नाही. या नैसर्गिक उपायांमुळे ऑक्सिजन घरात खेळती राहेल. यासह मच्छरांचा त्रास देखील कमी होईल. या झाडांच्या तीव्र गंधामुळे घरात डास शिरकाव करीत नाही. त्यामुळे ही ५ रोपं घरात नक्की लावा(Top 5 Mosquitoes Repellent Plants To Shoo Them Away).
लेमन ग्रास
लेमन ग्रासचा वापर जेवणात व चहा बनवण्यासाठी केला जातो. जर घरातून डासांना पळवून लावायचे असेल तर, घरात लेमन ग्रासचे झाड लावा. डासांना या वनस्पतीचा अम्लीय गंध अजिबात आवडत नाही. घरात जर लेमन ग्रासचे झाड असेल तर, घरातून डास पळून जातील. आपण हे झाड घरात किंवा खिडकीमध्ये ठेऊ शकता.
जुन्या पुराण्या टूथपेस्ट फेकू नका, चमचाभर टूथपेस्टने बाथरुम होऊ शकतं चकाचक!
पुदिन्याचे झाड
आपण पुदिन्याची चटणी ही खाल्लीच असेल. पुदिन्याच्या गंधामुळे डास घरात राहत नाही. त्यामुळे घरात किंवा खिडकीमध्ये पुदिन्याचे झाड लावा. याचे दोन फायदे होतील. यामुळे डास तर पळून जातीलच, यासह चटणी बनवण्यासाठी पुदिना घरीच उपलब्ध होईल.
रोज वापरात असलेल्या १० वस्तू वेळेत बदलल्या नाहीत तर..? टूथब्रश-टॉवेल नक्की किती दिवस वापरता..
रोझमेरी
रोझमेरी प्लांटचा वापर मेक्सिकन किंवा इटालियन खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. जर आपण हे झाड घरात किंवा आवारात लावले तर, डास घरात शिरणार नाही. डासांना या रोपट्यांचा वास अजिबात आवडत नाही. रोझमेरी या रोपट्याची फुले दिसायला अतिशय सुरेख दिसतात. आपण याचा वापर घर सजवण्यासाठी देखील करू शकता.
मिक्सर कळकट -चिकट झाला? ३ उपाय, मिक्सर दिसेल नवाकोरा चकाचक
लैव्हेंडर
सुंदर लैव्हेंडर वनस्पतीची फुले कोणाला आवडत नाहीत. पण या सुंदर फुलांचा गंध डासांना आवडत नाही. आपण याचे झाड घरी आणून ठेऊ शकता. याने घरातील सौंदर्य वाढते. यासह डासांपासून घरातील सदस्यांची सुटका होईल. मात्र, त्यांना वेळोवेळी पाणी देत राहा, व सूर्यप्रकाशही दाखवत राहा.
तुळस
तुळस प्रत्येक घरात आढळते, तुळशीची अनेक फायदे आहेत. त्यातील एक फायदा म्हणजे, तुळशीमुळे डास घरात शिरकाव करत नाही. तुळशीची दोन ते तीन रोपटे घरात ठेवल्यास, डासांची संख्या झपाट्याने कमी होते, व घरातील हवाही शुद्ध राहते.